शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Chanakyaniti: 'या' तीन प्रकारच्या लोकांकडून मदत घेतली, तर आयुष्यभर करावा लागेल पश्चात्ताप!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2024 15:43 IST

Chanakyaniti: क्षणाची मदत हे आयुष्यभराचे उपकार ठरू शकतात, म्हणून मदत घेताना कोणापासून सावध राहायला हवे ते सांगताहेत आचार्य चाणक्य!

आचार्य चाणक्य यांनी चाणक्यनीतीमध्ये मनुष्याला आयुष्याची जडण घडण होण्यास पूरक ठरतील असे आदर्शवादी आणि वास्तविक विचार मांडले आहेत. त्यांचे विचार आपल्याला विचार करायला लावून त्यानुसार कृती करायला भाग पाडतात. या लेखातही त्यांनी महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकला आहे.

'सुख के सब साथी, दुख मे न कोई' हे एक वाक्य आयुष्याचं मर्म सांगणारे आहे. आपल्या सुखाच्या अर्थात उत्कर्षाच्या काळात लोकांना बोलवावे लागत नाही तर ते आपणहून येतात. याउलट दुःखाच्या, संकटाच्या वेळी लोकांकडे मदत मागायला जाल, तर ते पाठ फिरवून घेतात. यासाठीच आपली ज्येष्ठ मंडळी आपल्याला नेहमी सांगत असत की मदत विचारपूर्वक मागायला हवी.

संकटकाळी जो आपल्या मदतीला येतो तो खरा मित्र, अशी मैत्रीची व्याख्या केली जाते. परंतु काही जण आपल्या परिस्थितीचा फायदा घेऊन आवळा देऊन कोहळा काढतात. अर्थात मदत थोडीशी करतात पण त्याचा चौपट मोबदला या ना त्या स्वरूपात वसूल करतात. यासाठी आचार्य चाणक्य तीन प्रकारच्या लोकांकडून प्रकर्षाने मदत टाळा असा सल्ला देतात.

स्वार्थी लोक:चाणक्य नीती सांगते स्वार्थी लोकांनी फुकट मदत केली तरी घेऊ नका. ते तुमचे भले कधीच करणार नाहीत. उलट तुम्ही जास्तीत जास्त संकटात कसे अडकाल यासाठी ते प्रयत्न करतील. अशा लोकांनी मदत करण्याचा आव आणला तरी त्याला भुलू नका. त्यांचा स्वार्थी स्वभाव ओळखून सावध पवित्रा घ्या आणि त्यांच्याकडून मदत स्वीकारू नका.

मत्सर करणारे लोक :जे लोक तुमच्या प्रगतीवर जळतात. तुमचा मत्सर करतात. तुम्हाला कमी लेखतात, अशा लोकांनी केलेल्या खोट्या स्तुतीला भुलू नका. तुमच्या दुःखाचे त्यांच्यासमोर प्रदर्शन करू नका. कारण असे लोक तुम्हाला बाहेरून सहानुभूती दाखवतील, पण तुमच्या दुःखाने त्यांनाच जास्त आनंद होईल हे लक्षात ठेवा. म्हणून आपले दुःख, आपल्या समस्या लोकांना सांगत फिरू नका!

तापट व्यक्ती :ज्या व्यक्तीचे स्वतःच्या रागावर नियंत्रण राहत नाही अशा व्यक्तीकडून कधीही मदत मागू नका. कारण अशी व्यक्ती आनंदाच्या भरात मदत करत असली तरी कधी तिचा मूड बदलेल आणि कधी ती रागाच्या भरात तुमच्याकडून केलेल्या उपकाराची वसुली करेल याचा नेम नाही. अशा व्यक्तींशी फार सलगी नको आणि दुष्मनीपण नको. त्यांचे उपकार तर नकोच नको!