शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

Chaitra Sankashti Chaturthi April 2023: चैत्र संकष्ट चतुर्थी: चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये? पाहा, कारण अन् चंद्रोदयाची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2023 07:57 IST

Chaitra Sankashti Chaturthi April 2023: संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊन मगच उपवास सोडला जातो. पाहा, चैत्र संकष्ट चतुर्थीच्या देशातील काही प्रमुख शहरातील चंद्रोदय वेळा...

Chaitra Sankashti Chaturthi April 2023: मराठी नववर्षाला सुरुवात झाली आहे. वर्षभर सण-उत्सवांची रेलचेल असणार आहे. त्यासोबतच अनेक अद्भूत शुभ योगही जुळून येणार आहेत. प्रथमेश असलेल्या बुद्धिदाता, सुखकर्ता गणपती बाप्पाची कृपा होण्यासाठी प्रत्येक महिन्यातील शुद्ध आणि वद्य पक्षात चतुर्थीचे व्रत केले जाते. पैकी वद्य पक्षातील संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च मानले जाते. यंदा ०९ एप्रिल २०२३ रोजी चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे. कोट्यवधी गणेश भक्त या दिवशी उपवास करतात. हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफल देतो, अशी मान्यता आहे.  मात्र, चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपास सोडू नये, असे म्हटले जाते. यामागील कारण आणि देशभरातील प्रमुख शहरांमधील चंद्रोदयाची वेळ जाणून घेऊया... (Chaitra Sankashti Chaturthi April 2023 Moonrise Timings)

चैत्र संकष्ट चतुर्थी: ‘या’ शुभ योगात करा बाप्पाची पूजा; चिंतामणी चिंतामुक्त करेल!

चैत्र संकष्ट चतुर्थी: रविवार, ०९ एप्रिल २०२३  

चैत्र वद्य चतुर्थी प्रारंभ: रविवार, ०९ एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०९ वाजून ३५ मिनिटे.  

चैत्र वद्य चतुर्थी समाप्ती: सोमवार, १० एप्रिल २०२३ रोजी सकाळी ०८ वाजून ३७ मिनिटे. 

बाप्पाच्या पूजनाची शुभ वेळ: ०९ एप्रिल रोजी सकाळी ०९ वाजून ३५ मिनिटांपासून ते १० वाजून ४८ मिनिटांपर्यंत.

अमृत योगातील पूजनाची वेळ: ०९ एप्रिल रोजी सकाळी १० वाजून ४८ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून २२ मिनिटांपर्यंत. 

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे चैत्र महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, ०९ एप्रिल २०२३ रोजी करावे, असे म्हटले जाते. 

हिंदू नववर्षातील पहिली संकष्टी; पाळा 'हे' चार नियम वर्ष जाईल आनंदी!

प्रत्येक संकष्ट चतुर्थीला गणेशभक्त आपापल्या परिने आणि पद्धतीने गणपती बाप्पाला भजत-पूजत असतात. गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते. अनेकांना प्रश्न पडतो की, अनेकदा सूर्यास्तानंतरही काही वेळ तृतीया असते. तर या दिवशी संकष्टी का? उपास तर तृतीयेमध्ये होते. तरीही संकष्ट चतुर्थी त्याच दिवशी करायची असते. कारण संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोष काळी करावयाचे व्रत आहे. हे व्रत चतुर्थी प्रधान आहे. याबाबत पुराणात एक कथा आहे.

संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपवास सोडणार नाही

गणेशाचे जे स्वरूप आहे ते चंद्राला नीट कळले नाही. चंद्राने गणेशाची टवाळी केली. त्यावर गणपतीने त्याला शाप दिला. तुझे तोंड कोणी पाहणार नाही. हा शाप देण्यामागचे कारण एवढेच होते, की कोणीही कोणाच्या व्यंगावर हसू नये आणि कोणाला कमी लेखू नये. चंद्राला त्याच्या चुकीची जाणीव झाली. गणपतीने त्याला क्षमा करत उ:शाप दिला, की गणेश चतुर्थीला तुझे दर्शन कोणी घेणार नाही पण संकष्टीला तुझे दर्शन घेतल्याखेरीज कोणी उपवास सोडणार नाही. गणेशाने दिलेल्या शब्दाचे पालन सर्व भक्त करतात. चतुर्थीला चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतात. काही जण एकादशीप्रमाणे दोन्ही वेळ उपवास करतात. परंतु संकष्टीच्या व्रतात दोन्ही वेळचा उपवास अपेक्षित नाही. म्हणून चंद्रदर्शन झाल्यावर काहीच नाही, तर निदान भात खाऊन उपवास सोडावा, असे सांगितले जाते.

देशातील काही प्रमुख शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे
ठाणेरात्रौ ०९ वाजून ५६ मिनिटे
पुणेरात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे
सातारारात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे
नाशिकरात्रौ ०९ वाजून ५४ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे
धुळेरात्रौ ०९ वाजून ५२ मिनिटे
जळगावरात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे
वर्धारात्रौ ०९ वाजून ३६ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०९ वाजून ३७ मिनिटे
बीडरात्रौ ०९ वाजून ४४ मिनिटे
सांगलीरात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे
सोलापूररात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
नागपूररात्रौ ०९ वाजून ३४ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०९ वाजून ४० मिनिटे
अकोलारात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे
छत्रपती संभाजीनगररात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे
भुसावळरात्रौ ०९ वाजता ४८ मिनिटे
परभणीरात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
नांदेडरात्रौ ०९ वाजून ३८ मिनिटे
धाराशीवरात्रौ ०९ वाजून ४१ मिनिटे
भंडारारात्रौ ०९ वाजून ३२ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०९ वाजून ३१ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०९ वाजून ४६ मिनिटे
मालवणरात्रौ ०९ वाजून ४८ मिनिटे
पणजीरात्रौ ०९ वाजून ४५ मिनिटे
बेळगावरात्रौ ०९ वाजून ४३ मिनिटे
इंदौररात्रौ ०९ वाजून ५१ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०९ वाजून ४९ मिनिटे

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती