शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उकळते जलकुंड तरीही थंडगार, देवीच्या अद्भुत शक्तिपीठाची माहिती आवर्जून वाचा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2021 17:03 IST

सनातन धर्मापासून देवीला शक्तीची देवता म्हणून पुजले जाते. पूर्ण देशात देवीची एकूण ५१ शक्तिपीठे आहेत. असे म्हणतात, की ही शक्तिपीठे शीव आणि शक्ती यांचे वसतीस्थान असते. 

हिमाचल प्रदेशात पुराण काळापासून ज्वालादेवीचे मंदिर आहे. तिथे काळानुकाळापासून नऊ मशाली अखंड प्रज्वलित आहेत़. असे म्हणतात, की आजतागायत देवी माता मशालींच्या उजेडात आपला निस्सिम भक्त गोरखनाथ याची वाट पाहत आहे. 

सनातन धर्मापासून देवीला शक्तीची देवता म्हणून पुजले जाते. पूर्ण देशात देवीची एकूण ५१ शक्तिपीठे आहेत. असे म्हणतात, की ही शक्तिपीठे शीव आणि शक्ती यांचे वसतीस्थान असते. 

या ५१ शक्तिपीठांपैकी एक आहे, हिमाचल प्रदेश येथील ज्वालादेवी मंदिर. हे मंदिर हिमाचल प्रदेशच्या कांगाडा जिल्ह्याच्या कालीधर डोंगररांगांमध्ये स्थित आहे. असे म्हणतात, की देवी सतीची जिव्हा अर्थात जीभ इथे पडली होती. तिथे पुराणकाळापासून ९ मशाली अखंडपणे प्रज्वलित आहेत. त्यात चांदीच्या मशालीशी स्थित असलेली देवी महाकाली म्हणून ओळखली जाते. अन्य ८ ज्वालांशी अन्नपूर्णा, चंडी देवी, हिंगलाज, विंध्यवासिनी, महालक्ष्मी, सरस्वती, अंबिका आणि अंजी या देवींचे मंदिर आहे.

या मंदिरात ज्वाला देवीचे मंदिर भाविकांसाठी मुख्य आकर्षण केंद्र आहे. तसेच तिथे एक कुंड आहे, त्याचे नाव आहे `गोरख कुंड' (गोरख डिब्बी )या कुंडाचे वैशिष्ट्य असे, की कुंडातले पाणी उकळत असल्याचा भास होतो. वास्तविक, हात लावला असता ते पाणी थंडगार असते. त्या मंदिर परिसरात गोरखनाथांनी वास्तव्य केले होते, म्हणून कुंडाला त्यांचे नाव दिले गेले. 

गोरखनाथ इथेच देवीची सेवा करत असत. एकदा गोरखनाथांना भूक लागली होती, तेव्हा त्यांनी देवीला त्या कुंडात पाणी तापायला ठेवण्यास सांगितले. आपण भिक्षा मागण्यासाठी निघून गेले. भिक्षेत मिळालेले धान्य शिजवून देवीला नैवेद्य व आपल्याला भोजन, अशी त्यांची इच्छा होती. परंतु, त्यावेळेस गोरखनाथ देवीचा निरोप घेऊन गेले, ते परतलेच नाहीत. देवी आजही पूत्रसमान असलेल्या भक्ताची वाट पाहत आहे. म्हणूनच कुंडातील पाणी उकळत असल्याचा भास होतो. परंतु, खुद्द गोरखनाथ तिथे येईपर्यंत हा केवळ आभासच राहील.

कलियुग संपून सतयुग येईल, तेव्हा गोरखनाथ आणि देवीची पुनश्च भेट होईल, असे म्हटले जाते. अशा अद्भुत मंदिराचा परिसर, कुंड आणि ज्वालादेवीचे दर्शन घेतलेच पाहिजे. ज्वालादेवी माती की जय!