शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

भक्त श्रेष्ठ की  भगवंत? या प्रश्नाचे उत्तर दडले आहे या सुभाषितात!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: February 9, 2021 09:00 IST

भक्त आणि भगवंत या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.

एकदा महर्षी नारद नारायण नारायण म्हणत भगवान महाविष्णूंकडे आले. त्यांना म्हणाले, 'भगवंता आम्ही भक्तांनी तुम्हाला शोधायचे तरी कुठे?'त्यावर भगवान विष्णू म्हणाले, 'जे सर्वात पवित्र आणि उच्च स्थान आहे तिथे!'महर्षी म्हणाले, 'अच्छा म्हणजे हिमालयात? पण तिथे तर देवाधिदेव महादेव असतात. तुमचे स्थान खरे तर क्षीरसागरात. पण तुमच्या भेटीला यावं तर तुम्ही नेहमी भक्तांच्या सान्निध्यात असता.' भगवान विष्णू हसून म्हणाले, 'नारदा तूच तुझं उत्तर दिलं आहेस. मी सर्वात पवित्र आणि उच्च स्थानी असतो. ते स्थान म्हणजे भक्ताचे हृदय!'

पृथ्वी तावदियं महत्सू महति तद्वेष्ठनं वारीधीः।पीतोऽसौ कलशोद्भवेन मुनीना स व्योम्नि खद्योतवत्।तद्विष्णो परमं पदं कलयतः पूर्ण पदं नाभवत।सोऽपि त्वदहृदी नर्तते खलु भवस्ततः परः को महान॥

पृथ्वी महान आहे. त्यापेक्षा त्या पृथ्वीला वेष्टण करणारा समुद्र महान आहे. असा समुद्र अगस्ती ऋषींनी एकाच आचमनात प्राशन केला .असे(अगस्ती) मुनी आकाशात एका काजव्या सारखे (तारा)आहेत. असे आकाश देवाने( वामन अवतारात) एकाच पावलात व्यापले .असा देव ज्या भक्तांच्या हृदयात आहे ,त्या भक्तांपेक्षा जगात मोठे कोण आहे?( भक्तच सर्वश्रेष्ठ आहेत.)

भक्तामुळे भगवंताची ओळख आहे आणि भगवंतामुळे भक्ताची. त्यामुळे या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.