शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

श्रीमद् भगवद्गीता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 04:58 IST

रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असा प्रश्न पडू शकतो की, मी योग्य करतो आहे का अयोग्य करतो आहे.

- सौरभ कुलकर्णीश्रीमद् भगवद्गीता या ग्रंथाला वेदांचे सार असे म्हटले जाते. संपूर्ण वेद हे आपल्याला जीवन कसे जगावे हे शिकवितात. म्हणूनच त्यांना शास्त्र असेही म्हटले जाते. त्याप्रमाणे भगवद्गीतेलाही शास्त्र म्हटले जाते. कारण यामध्ये भगवान वेदव्यासांनी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या संवादाद्वारा, तसेच अर्जुनाला उदाहरण म्हणून घेऊन जीवनाची सोपी पद्धती अठरा अध्यायांद्वारे समजावून सांगितली. म्हणून भगवद्गीता या ग्रंथाला शास्त्र असे म्हटले जाऊ शकते. या ग्रंथाची निर्मिती कर्ममार्ग, उपासनामार्ग, तसेच ज्ञानमार्ग असे तीन मार्ग सांगण्यासाठी केलेली आहे. याच्या पहिल्या अध्यायाचा जर आपण विचार केला तर यात उदाहरण असणारा अर्जुन हा स्वत:चा स्वभवत: असणारा जो क्षत्रियधर्म ‘दुष्टपणाचे निवारण करून सज्जनांचे रक्षण करणे’ आहे ते करण्यासाठी प्रवृत्त आलेला असला तरीही समोर युद्धासाठी जेव्हा आप्तस्वकीय लोकच आहेत हे पाहताच त्याचा निश्चय ढळायला सुरुवात झाली असे पहिल्या अध्यायात सांगितले आहे.

रोजच्या व्यवहारात आपणही चांगल्या हेतूने एखादी गोष्ट करायला जातो तेव्हा काही कारणांमुळे असा प्रश्न पडू शकतो की, मी योग्य करतो आहे का अयोग्य करतो आहे. तेव्हा आपला उद्देश योग असेल आणि तो पूर्ण करण्यासाठी निवडलेल्या मार्गामध्ये कोणाबद्दलही शारीरिक, मानसिक, वाचिक हिंसा घडू नये आणि जर अपरिहार्य कारणांमुळे होत असेलच तर तेवढ्या गोष्टींसाठी त्या व्यक्तीची आणि ईश्वराची माफी मागून योग्य म्हणजेच सर्वांसाठी हितकारक अशा गोष्टी आयुष्यभर करीत राहणे हे अर्जुनाच्या दृष्टांताने आपल्याला या ग्रंथातून शिकायचे आहे. म्हणून हा एक उत्तम शास्त्रग्रंथ आहे. या ग्रंथाचे वाचन करून त्यात सांगितलेल्या कर्ममार्गाचे आचरण फळाची इच्छा सोडून आपण करीत राहिलो, तर निश्चितपणे आपल्याला संसारात राहूनही अर्जुन आदींप्रमाणे आपले कल्याण साधायला उशीर होणार नाही.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक