शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
3
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
4
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
5
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
6
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
7
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
8
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
9
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
10
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
11
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
12
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
13
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
14
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
15
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
16
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
17
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
18
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
19
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
20
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार

सर्वार्थ सिद्धी योगात रवि प्रदोष: ‘असे’ करा व्रत, म्हणा प्रभावी मंत्र, ‘हे’ उपाय लाभदायक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2024 14:18 IST

Bhadrapad Ravi Pradosh Vrat September 2024: रवि प्रदोष व्रत शुभ पुण्य फलदायी मानले गेले आहे. महादेवांसह सूर्योपासना करणे अतिशय लाभदायक ठरेल, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Bhadrapad Ravi Pradosh Vrat September 2024: भाद्रपद महिना सुरू आहे. काही दिवसांनी पितृ पंधरवडा सुरू होणार आहे. चातुर्मास काळात महादेव सृष्टीचे चालन पालन करतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे या काळात महादेवांचे पूजन, उपासना, नामस्मरण याला अधिक महत्त्व असल्याचे सांगिततले जाते.  प्रत्येक महिन्यात त्रयोदशीला प्रदोष तिथी असते. या तिथीला शंकराच्या पूजनासाठी प्रदोष व्रत केले जाते. १५ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदोष आहे. 

भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षातील प्रदोष रविवारी येत आहे. त्यामुळे याला रवि प्रदोष असे म्हटले जाते. या दिवशी महादेव शिवशंकराच्या पूजनासह नवग्रहांचा राजा मानल्या गेलेल्या सूर्याची उपासना करणे लाभदायक मानले जाते. या दिवशी सकाळी सूर्याला अर्घ्य देणे, सूर्य पूजन करणे, सूर्य मंत्रांचे, स्तोत्रांचे पठण करणे उपयुक्त मानले जाते. असे केल्याने कुंडलीतील सूर्य सकारात्मक होऊ शकतो. सूर्याचा सकारात्मक प्रभाव वाढू शकतो, असे सांगितले जाते. 

प्रदोष व्रताचे महात्म्य अन् मान्यता

प्रदोष हे शंकराला समर्पित व्रत असून, यामुळे मनोकामना पूर्ण होऊ शकतात. कुटुंबात सुख, समृद्धी वृद्धी होऊ शकते. शत्रूंपासून बचाव होऊ शकतो. यासह अनेकविध प्रकारचे लाभ प्राप्त होऊ शकतात, असे सांगितले जाते. काही पौराणिक उल्लेखानुसार, भोलेनाथ हे महादेव, महाकाल, त्रिकालदर्शी आहेत. शंकराला समर्पित या तिथीचे व्रत केल्यास अनेक लाभ मिळू शकतात. सुख, ऐश्वर्य, वैभव, सौभाग्य प्राप्त होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. 

प्रदोष व्रत कसे करावे? पाहा, पूजनविधी

१५ सप्टेंबर २०२४ रोजी असणाऱ्या प्रदोष व्रतावेळी सर्वार्थ सिद्धी योग जुळून आल्याचे म्हटले जात आहे. प्रदोष व्रतामध्ये प्रदोष काळात म्हणजेच तिन्हीसांजेला किंवा दिवेलागणीच्या वेळेला महादेव शिवाची पूजा केली जाते. महादेवांचे पूजन झाल्यानंतर शिव पंचाक्षर मंत्र 'ॐ नमः शिवाय'चा यथाशक्ती जप करणे लाभदायक मानला जाते. शक्य असल्यास रुद्राभिषेक किंवा जलाभिषेक करावा. अनेक भाविक या दिवशी संपूर्ण दिवस उपास करतात. महादेवांची षोडषोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा करावी. बेलपत्र, फुले अर्पण करावीत. धूप, दीप, नैवेद्य दाखवून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. मनोभावे महादेवांचे नामस्मरण, स्तोत्र पठण करावे. यासह 'ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमही तन्नो रुद्र: प्रचोदयात्।' हा शिवाचा गायत्री मंत्र आणि 'ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् । उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात् ॥' या मृत्यूंजय मंत्राचे पठण, जप अवश्य करावे. यासह ॐ 'नमो भगवते रुद्राय नमः', 'ऊं पषुप्ताय नमः', या मंत्रांचे पठण लाभदायक मानले गेले आहे, असे सांगितले जाते. 

रवि प्रदोष व्रतात कोणते उपाय करावेत?

- मनोकामना पूर्ण करण्यासाठी ओम नमः शिवाय मंत्राचा जप करा किंवा पूजेच्या वेळी  भोलेनाथांना ओम नमः शिवाय म्हणत बिल्वपत्र अर्पण करा. या उपायाने तुमची जी काही इच्छा असेल ती शिवाच्या कृपेने पूर्ण होईल.

- रवि प्रदोष व्रताच्या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. 

- अज्ञात भीती वाटत असेल, शरीर शक्तीहीन वाटत असेल, आत्मविश्वासाची कमतरता असेल तर प्रदोष व्रताच्या दिवशी शिव पंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय १०८ वेळा जप करावा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष किंवा चंदनाच्या माळा वापरा. तुम्हाला लाभ होईल.

- घरातील, कुटुंबातील शांततेसाठी, सुख-समृद्धीसाठी प्रदोष व्रताच्या दिवशी पूजेच्या वेळी भगवान शंकराला ज्वारीचे पीठ अर्पण करा. नंतर त्यापासून भाकरी बनवून बैल किंवा गाय वासराला खाऊ घाला. तुमची इच्छा पूर्ण होईल, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते.

- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Puja Vidhiनवरात्री पूजा विधी २०२३chaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक