शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
8
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
9
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
10
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
11
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
12
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
13
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
14
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
15
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
16
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
17
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

कावेरीतील नयनरम्य नटद्रीश्वर मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2020 15:53 IST

नटद्रीश्वर येथे प्राणप्रतिष्ठित केलेले लिंग हे वाळू त्याकाळच्या पारंपरिक पदार्थांमध्ये मिसळून त्यापासून तयार केले आहे. हे वाळूचे लिंग आजही भौतिकदृष्टीने शाबूत आहे.

सद्‌गुरु: कावेरी नदीच्या मध्यबिंदूवर असलेले नटद्रीश्वर मंदिर हे एक अदभूत मंदिर आहे. तळ कावेरी ते समुद्र या नदीच्या मार्गावर बरोबर मध्यावर असणाऱ्या कावेरीमधील एक बेटावर हे आहे. म्हणून याला कावेरीची नाभी म्हटले जाते.

असे म्हटले जाते की या मंदिरातील लिंग अगस्तीमुनींनी ६००० वर्षांपेक्षाही आधी प्राणप्रतिष्ठित केले. अगस्तीमुनीं एक असामान्य जीवन जगले. असं म्हटलं जातं की त्यांच्या आयुष्याचा काळही असामान्यरित्या मोठा होता. दंतकथा असे सांगते की ते ४००० वर्षे जगले. आपल्याला हे माहिती नाही की ते ४००० आहे का ४०० पण आपण भारतीय असल्याने आपण सढळपणे शून्य वापरतो, शेवटी तो आपला शोध आहे.तर आपल्याला हे माहिती नाही कि ते किती वर्षे जगले पण त्यांनी पायी कापलेल्या अंतरावरून, ते नक्कीच असामान्यरित्या जास्त जगले. जर तुम्ही भारताच्या दक्षिणेला गेलात विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे कुठेही, जवळपास सगळ्याचखेड्यांतलोक सांगतील “अगस्तीमुनींनी इथे ध्यान केलं, अगस्ती मुनी या गुहेत राहिले, अगस्तीमुनींनी हे झाड लावलं.” या सारख्या अगणित गोष्टी आहेत कारण त्यांनी हिमालयाच्यादक्षिणेकडील प्रत्येक मानवी वस्तीला अध्यात्मिक प्रक्रिया दिल्या, एक शिकवण, धर्म किंवा कोणते तत्वज्ञान म्हणून नाही, तरआयुष्याचा एक भाग म्हणून. जशी आई तुम्हाला शिकवते की सकाळी उठून दात कसे घासावे, तसंच अध्यात्मिक प्रक्रिया शिकवली गेली. त्याचेच अवशेष आज संस्कृतीमध्ये शिल्लक आहेत खासकरून देशाच्या दक्षिणेकडे.नटद्रीश्वर येथे प्राणप्रतिष्ठित केलेले लिंग हे वाळू त्याकाळच्या पारंपरिक पदार्थांमध्ये मिसळून त्यापासून तयार केले आहे. हे वाळूचे लिंग आजही भौतिकदृष्टीने शाबूत आहे, आणि ऊर्जेच्या दृष्टिकोनातून ते स्फोटक आहे! जरी ते ६००० वर्षांपूर्वी तयार केलेले असले, ते असे जाणवते की अगदी काल तयार केले आहे.

साधारपणे असा समज आहे की अगस्ती मुनी त्यांच्या ऊर्जा आणि त्यांचे सूक्ष्म शरीर या जागेत सोडून गेले. असं म्हटलं गेलंय की त्यांनी त्यांचा मनोमायकोष मदुराई जवळ चतुरंगी टेकडीवर ठेवला आहे आणि कार्तिकेयाच्या मदतीने त्यांनी त्यांचं भौतिक शरीर कैलास जिथे शिव होता तिथे नेलं आणि तिकडेच ठेवलं असं म्हटलं गेलं आहे. हे अद्भुत आहे.

एकप्रकारे ते कावेरीकडे एक सजीव शरीर म्हणून पहात आहेत आणि त्यांनी नटद्रीश्वर येथे नाभी केंद्र अशा प्रकारे स्थापित केले की उर्जेची ऊर्ध्वगामी आणि अधोगामी हालचाल योग्य प्रकारे होते. या सर्व गोष्टींमुळेच, हजारो वर्षांपासून आपण पुन्हा कावेरी प्रवाहित करणे अधिक महत्वाचे बनले आहे. हे केवळ अस्तित्व किंवा शेतीसाठी नाही तर बर्‍याच मोठ्या गोष्टींसाठी आहे.या देशाच्या संस्कृतीचे सर्वात महत्त्वाचा पैलू म्हणजे मानवी अस्तित्व आणि समृद्धी हे जीवनाचे उद्दीष्ट नव्हे तर केवळ परिणाम होता. जीवनाचे ध्येय हे कायम मानवाचे बहरणे हेच राहिले आहे. मानवाच्या प्रगतीसाठी आणि मानव व्यक्तिशः बहरण्यसाठी अनेक महान माणसांनी विशिष्ट प्रकारे ऊर्जा खर्च केली. त्यांनी आवश्यक उर्जा प्रणाली तयार केल्या आणि सर्वकाही त्या दिशेने शक्यता म्हणून तयार करण्याचा प्रयत्न केला - अगदी एक नदीसुद्धा!