शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Atro Tips:ज्यांच्या आयुष्यात शनी ग्रहामुळे यशप्राप्तीत विलंब होतोय, त्यांनी 'हे' शनिस्तोत्र सुरू करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2023 07:00 IST

शनी म्हणजे विलंब; ज्यांच्या राशीला हा ग्रह येतो त्यांची कामे पूर्ण होतात, पण उशिराने; त्यांच्यासाठी हा मंत्र!

'श' म्हणजे शांती आणि `नि' म्हणजे निश्चय देणारी देवता म्हणजे शनी! ज्या शनिमहाराजांना आपण बघायलाही घाबरतो, त्यांना खगोलशास्त्राने सर्वात मनोहारी ग्रह असल्याचे म्हटले आहे.  ह्या ग्रहाभोवती असलेली कडी अतिशय नेत्रदीपक आहे, असे म्हणतात. म्हणजेच काय, तर त्यांच्याकडे बघण्याची आपली दृष्टी बदलणे गरजेचे आहे.

सूर्यदेवाचे पुत्र, यमदेवाचे ज्येष्ठ बंधू आणि वायुपुत्र हनुमंताचे जिवलग मित्र असलेले शनिदेव, त्यांचे वर्णन करताना महर्षी वेदव्यासांनी नवग्रह स्तोत्रात म्हटले आहे -

नीलांजन समाभासं रविपुत्रं यमाग्रजमछायामार्तंड संभूतं तं नमामि शनैश्चरम।।

'शनी' हा ग्रह नवग्रहांमध्ये सर्वश्रेष्ठ असल्याचे म्हटले जाते. मात्र, त्यांच्याबद्दलचा लोकांचा `ग्रह' आजतागायत शुद्ध झालेला नाही, उलटपक्षी ते आपल्या राशीला येऊ नयेत म्हणून सगळे `आग्रही' असतात. एखाद्याला रावाचा रंक, तर एखाद्याला रंकाचा राव बनवण्याची किमया त्यांच्याकडे आहे. ते कठोर शासनकर्ते आहेत. म्हणून, जे लोक दुष्कृत्य करतात, ते त्यांना बाचकून असतात. मात्र ज्या व्यक्तीचे आचरण शुद्ध असते, अशा व्यक्तींनी शनी महाराजांची भीती बाळगण्याचे अजिबात कारण नाही. मनुष्याला शिस्त लागावी म्हणून साडेसातीच्या काळात ते कठोरपणे वागतात, पण ती व्यक्ती सुधारली तर तिचा उद्धारही करतात.

रामायणात राम-सीतेला जो वनवास घडला तो शनीच्या साडेसातीमुळे, रावणाचा पराभव झाला, तो शनीची वक्रदृष्टी झाल्यामुळे, कृष्णावर स्यमंतक मणी चोरल्याचा आळ आला, राजा हरिश्चंद्र आणि तारामतीलाही शनिपीडा सहन करावी लागली. इतकेच काय, तर शनी महाराजांचे जन्मत: सावळे रूप पाहून ते आपले अपत्य असूच शकत नाही, असे म्हणत आपल्या बायकोच्या चारित्र्यावर शंका घेणाऱ्या सूर्यदेवालाही अर्थातच आपल्या जन्मदात्या पित्यालाही माफ केले नाही, तर आपली काय कथा? 

शनि महाराजांनी कावळ्याला आपले वाहन निवडले, कारण कावळ्याकडे अतिशय सूक्ष्म नजर असते, तो घाण स्वच्छ करतो. समाजातील अनैतिकतेची, अंधश्रद्धेची, असमानतेची घाण स्वच्छ करण्यासाठी शनी महाराज कावळ्यावर स्वार झाले आहेत.

शनी महाराज अत्यंत  शीघ्रकोपी आहेत असे म्हटले जाते. जी व्यक्ती चुकीचे काम करते त्याच्यावर कोणाचाही कोप होणे स्वाभाविक आहे, मग शनी महाराज त्यासाठी अपवाद कसे ठरतील? उलट जे लोक धैर्याने संकटांना सामोरे जातात, त्यांना शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते. हेच सांगणारी विक्रमादित्य राजाची पौराणिक कथा आपल्या सर्वांच्या परिचयाची आहे. त्याच्या कठोर परिश्रमांना पाहून शनी महाराजांनी त्याची ज्या ठिकाणी साडेसातीतून मुक्तता केली, ते ठिकाण म्हणजे नंदुरबार येथील `शनिमांडळ'. ते स्थान शनी साडेसाती मुक्तीस्थान म्हणूनही ओळखले जाते.  या तीर्थक्षेत्री स्त्रियांनाही दर्शन घेण्याची परवानगी आहे. त्यामुळे असंख्य भाविक शनी महाराजांच्या दर्शनाला तिथे पोहोचतात. भक्तिभावाने शरण गेलेल्या भक्ताला शनी महाराजांची कृपादृष्टी लाभते, असा आजवरचा भक्तांचा अनुभव आहे. 

त्यांची निष्काम मनाने भक्ती करणाऱ्याला आणि शुद्ध आचरण ठेवून आपले काम चोखपणे करणाऱ्या व्यक्तीला शनि महाराजांची कृपादृष्टी लाभते, अशी ग्वाही शनिस्तोत्रात आढळते.

सूर्य पुत्रो दीर्घ देहो विशालाक्ष: शिवप्रिय:।मन्दचार: प्रसन्नात्मा पीडां हरतु मे शनि:।।