शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेच्या दर्शानाला गेलेच पाहिजे; का? ते जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2023 11:23 IST

कुळाचा उद्धार करणारी आणि रक्षण करणारी आपली कुलदैवतं यांच्या पूजेने, दर्शनाने कोणते लाभ होतात ते सविस्तर वाचा. 

आपल्या कुळातील आचारानचे आचरण करा व शास्त्रांनी जी कर्मे करावी व कोणते करू नये, असे सांगितले आहे त्यालाच कुळधर्म आणि कुळाचार म्हटले आहे. या नियमांच्या चौकटीत राहून वागले असता, हातून चुका घडण्याची भीती राहत नाही.  याबद्दल अधिक स्पष्टीकरण देताना संतश्रेष्ठ तुकाराम महाराज लिहीतात, 

कुळधर्म ज्ञान कुळधर्म साधन, कुळधर्म निधान हाती चढे।कुळधर्म भक्ति कुळधर्म गति, कुळधर्म विश्रांती पाववील।कुळधर्म दया कुळधर्म उपकार, कुळधर्म सार साधनांचे।कुळधर्म महत्त्व कुळधर्म मान, कुळधर्म पावन परलोकीचे।तुका म्हणे कुळधर्म दावी देवी देव, यथाविध भाव जरी होय।

जो आपल्या कुळातील धर्माचे पालन करतो त्याला ज्ञान प्राप्त होते. त्याच्याकडून साधना होते. त्याच्या कुळधर्मांमुळे त्याच्या हाती ज्ञानाचे निधान म्हणजे परमेश्वर येतो. ज्याच्या ठिकाणी कुळधर्माचे आचरण आहे, त्याच्याकडून भक्ती होते. त्याला त्यामुळे उत्तम गती मिळते आणि तो विश्रांतीला पोहोचतो. जो कुळातील धर्म पाळतो व दुसऱ्यांवर दया करून उपकार करतो, त्याचा तो कुळधर्म साधनांचे सार आहे. कुळधर्म त्याला महत्त्व व मान प्राप्त करून देतो आणि परलोकी पावन करतो. तुकाराम महाराज म्हणतात, जर त्याच्या ठिकाणी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे कुळधर्म करण्याचा भाव असेल, तर तो कुळधर्म त्याला देव देवतांचे दर्शन घडवतो.

संत शिरोमणी तुकाराम महाराज यांनी कुळधर्म विषयावर आपल्या या अभंगात त्या व्यक्तीची उन्नती या लोकी आणि परलोकीही कशी होऊ शकते, हे सांगितले आहेच. पण केवळ त्याची यातून होणारी अशी उन्नती सांगून महाराज थांबले नाहीत, तर कुळधर्म पाळणारी व्यक्ती ही दयाळू आणि इतरांवर उपकार करणारी बनते असेही सांगतात. म्हणजे महाराजांनी कुळधर्माची सांगड समाजाबाबतच्या कर्तव्याशी घातलेली आहे.

ज्ञानाइतकी पवित्र अन्य गोष्ट या विश्वात कोणतीही नाही. अन त्या ज्ञानाचे निधान म्हणजे परमेश्वर त्याची प्राप्ती या कुळधर्म पालनातून होऊ शकते. देव देवीचे दर्शन घडवण्याचे सामर्थ्य कुळधर्म पालनात आहे, असे महाराजांनी ठासून सांगितले आहे.