शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
4
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
5
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
6
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
7
१ महिना सूर्य-शनि समोरासमोर: ८ राशींना विशेष लाभ, भरभरून पद-पैसा; शुभ-कल्याण, सुखाचा काळ!
8
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
9
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना
10
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
11
"महाराष्ट्रातील मतचोरीचाही राहुल गांधींकडून पर्दाफाश, फडणविसांनी तात्काळ राजानीमा द्यावा’’, काँग्रेसची मागणी   
12
डॉक्टरांनी फ्लू सांगितलं पण आईने गुगलवर शोधलं; लेकाला गंभीर आजार असल्याचं समजलं अन्...
13
प्रिती झिंटाच्या संघाची उडाली दाणादाण; फलंदाजांनी केली हाराकिरी, फायनलचं स्वप्न भंगलं?
14
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
15
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
16
Lahori Zeera Success Story: १० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
17
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
18
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
19
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
20
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य

उन्हाळ्यात घरबसल्या मिळवा जलदानाची संधी आणि भरपूर पुण्य; वाचा 'या' महत्त्वाच्या गोष्टी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 15:21 IST

भुकेल्याला अन्न आणि तहानलेल्याला पाणी द्या, ही आपल्या संस्कृतीची शिकवणा; तिची अंमलबजावणी करण्याची हीच ती वेळ!

मार्च महिना सुरू काय सुरू झाला आणि सूर्यदेवांनी तपमानात वाढ करायला सुरुवात केली. त्यात घामाच्या धारा आणि पाणीटंचाई हे विजोड समीकरण! दर दोन दिवसांनी पाण्याचे टँकर मागवा नाहीतर पाणी यायची वाट बघत बसा. ही अवस्था मार्चमध्ये, अजून तर एप्रिल आणि मे काढायचा आहे. तेव्हा काय परिस्थिती असेल, याची कल्पनाही करवत नाही. आपले हे हाल तर बिचाऱ्या प्राणिमात्रांचे काय हाल होत असतील, हा विचार करून आपण भूतदयेपोटी शक्य तेवढे जलदान केले पाहिजे. पाण्याचा वापर जपून केला पाहिजे. उन्हातान्हात थकून भागून आलेल्या व्यक्तीला निदान पाणी विचारले पाहिजे. हा आपला अतिथी धर्म आहे. त्याचे पालन निश्चितच केले पाहिजे. 

याशिवाय आपण सर्वांनी मिळून आई भगवतीला तृष्णा रूपाने सर्वांची तहान भागवावी, सर्व जीवांना जीवदान द्यावे, अशी प्रार्थना केली पाहिजे. 

या देवी सर्वभूतेषु तृष्णा-रूपेण संस्थिता। नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 

सदर श्लोकात तृष्णा हा शब्द इच्छा या अर्थी वापरला आहे. सर्वांची इच्छापूर्ती व्हावी, अशी श्लोकात प्रार्थना केली आहे. परंतु जेव्हा पाण्याचा प्रश्न उपस्थित होतो, तेव्हा डोळ्यात पाणी येते आणि अन्य कोणतीही इच्छा उरत नाही. म्हणून आपणही मनोभावे देवीला प्रार्थना करूया आणि यथाशक्ती जलदान करूया. 

हे दान घरबसल्या सुद्धा करता येण्यासारखे आहे. त्यासाठी आपल्या खिडकीत पाण्याचे भांडे ठेवा आणि सकाळ संध्याकाळ ते स्वच्छ करून पाण्याने भरत राहा. मग जादू बघा. चिमण्या, कावळे, खारुताई, पोपट, मैना तुमच्या अंगणात येतील, पाणी पितील आणि तृप्त होऊन जातील. त्याबरोबरच अनेक ठिकाणी पांथस्थांसाठी रस्त्याच्या चौकात, एखाद्या झाडाखाली, पारावर पाण्याचे माठ भरून ठेवले जातात. जेणेकरून येणा जाणाऱ्या वाटसरूला गरज लागल्यास माठाचे थंड पाणी पिता येईल. तुमच्याही नजरेत असे मोक्याचे ठिकाणी आढळले तर तुम्हीसुद्धा स्वखर्चाने तिथे जलदान पात्र ठेवू शकता. दररोज सकाळी  भरून ठेवले की पांथस्थांना त्याचा लाभ घेता येईल आणि तुम्हाला जलदानाचे पुण्यही लाभेल! 

तीच बाब गाय, कुत्रे, मांजरांची! त्यांच्यासाठीही रस्त्याच्या कडेला एखाद्या खोलगट भांड्यात पाणी भरून ठेवा. जेणेकरून तुमच्या मुळे तहानलेल्या जीवाला पाण्यासाठी वणवण फिरावे लागणार नाही आणि त्यांची तहानही भागेल. 

टॅग्स :Summer Specialसमर स्पेशल