शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

Astro Tip: शुक्रवार विशेष: लक्ष्मीपूजेसोबतच 'अशी' करा कुबेर साधना; पैसा टिकेलही आणि दुप्पट वेगाने वाढेलही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 07:05 IST

Astro Tips: दर शुक्रवारी लक्ष्मीपूजनासोबतच करा कुबेर साधना. जाणून घ्या कुबेर महाराजांची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि धनप्राप्तीचा प्रभावी मंत्र.

शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो, पण शास्त्रात लक्ष्मीपूजनासोबतच 'कुबेर' पूजनालाही अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. आपण म्हणतो की, "सगळी सोंगं घेता येतात, पण पैशांचं सोंग घेता येत नाही." संसारी जीवनात पावलोपावली पैशाची गरज भासते. पण पैसा केवळ येऊन चालत नाही, तर तो योग्य मार्गाने येणे आणि घरात टिकणेही तितकेच महत्त्वाचे असते.

हे ही वाचा: Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!

संत तुकाराम महाराज म्हणतात, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे'—अर्थात कष्टाने आणि चांगल्या मार्गाने धनसंचय करावा. जर तुमच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नसेल किंवा उत्पन्नाची साधने वाढत नसतील, तर ज्योतिष शास्त्राने सांगितलेला कुबेर महाराजांचा हा 'खास' तोडगा तुम्हाला निश्चितच लाभ देईल.

धनाची देवता कुबेर महाराज हे अत्यंत कल्याणकारी मानले जातात. घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी कुबेर महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये असणे अत्यंत शुभ ठरते. पण, वास्तुशास्त्रानुसार ती कोणत्या दिशेला असावी, याचे काही विशेष नियम आहेत.

१. पैसा साठवण्यासाठी: उत्तर दिशा (Savings & Stability)कुबेर महाराज हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत. जर तुम्हाला असे वाटत असेल की घरात पैसा येतो पण तो विनाकारण खर्च होतो, पाण्याचा ओघ असल्यासारखा निघून जातो, तर कुबेर महाराजांची प्रतिमा घराच्या उत्तर दिशेला लावा. यामुळे पैशांचा अपव्यय थांबतो आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते.

२. उत्पन्न वाढवण्यासाठी: पश्चिम दिशा (Multiplication & Growth)जर तुम्हाला तुमची आवक वाढवायची असेल, नोकरी-व्यवसायात प्रगती हवी असेल, तर कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा पश्चिम दिशेला लावा. वास्तूमध्ये पश्चिम दिशा ही कोणत्याही गोष्टीला 'द्विगुणित' (Double) करणारी मानली जाते. येथे कुबेर महाराजांचे पूजन केल्यास उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात आणि संपत्तीत दुप्पट वाढ होते.

महत्त्वाची टीप: पश्चिम दिशेला उभे असताना कधीही नकारात्मक विचार करू नका, कारण ही दिशा विचारांनाही दुप्पट करते. त्यामुळे या दिशेला कायम सकारात्मक आणि समृद्धीचे विचार ठेवावेत.

हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!

कुबेर मंत्र आणि संध्याकाळची साधना (Mantra & Ritual)आर्थिक अडचणींच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी दररोज संध्याकाळी कुबेर महाराजांच्या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरते.

साधना विधी:

सायंकाळी हात-पाय स्वच्छ धुवून किंवा आंघोळ करून पवित्र व्हावे.

कुबेर महाराजांच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी.

जपमाळ घेऊन खालील मंत्राचा श्रद्धेने १०८ वेळा जप करावा:

ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥

 

English
हिंदी सारांश
Web Title : Astro Tip: Kubera Sadhana with Lakshmi Puja for Wealth Growth

Web Summary : Performing Kubera Sadhana alongside Lakshmi Puja on Fridays can attract and retain wealth. Place Kubera's image in the north for savings and west for income growth. Recite the Kubera mantra 108 times in the evening for financial stability.
टॅग्स :Astrologyफलज्योतिषLaxmi Pujanलक्ष्मीपूजनPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधी