शहरं
Join us  
Trending Stories
1
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
2
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
3
“बेस्ट निवडणूक बॅलेट पेपरवर, तरी ठाकरे ब्रँडचा बॅन्ड वाजला, मुंबईकरांनी…”; कुणी केली टीका?
4
Airtel चा ग्राहकांना धक्का! सर्वात स्वस्त प्लान बंद, आता इतके रुपये जास्त मोजावे लागणार
5
IT सेक्टर धोक्यात; ८० हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढले, नवीन भरतीही कमी झाले; कारण...
6
Donald Trump Tariff On India: ट्रम्प यांनी भारतावर का लावलंय मोठ्या प्रमाणात टॅरिफ, अखेर व्हाईट हाऊसनं सांगितलं कारण
7
Mumbai Rain Updates Live: मुंबईसाठी हवामान विभागाचा ऑरेंज अलर्ट, मुंबई रेल्वेची वाहतूक धीम्या गतीनं सुरू
8
'नोरा फतेहीसारखी फिगर बनव'; पतीने केला पत्नीचा अतोनात छळ, चिडलेल्या तिने शिकवला 'असा' धडा!
9
मुंबई महापालिकेची रंगीत तालीम! ठाकरे ब्रँडची ‘बेस्ट’ युती; ‘असा’ फिरला गेम, नेमके काय घडलं?
10
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
11
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
12
गृहकर्जाचे हप्ते डोईजड झालेत? सरकार स्वस्तात देतंय २५ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज; कोण घेऊ शकतो लाभ?
13
'मुंबईचा फौजदार' सिनेमाचा रिमेक येणार? गश्मीर म्हणाला- "मी सिनेमा बनवेन पण प्राजक्ता माळीला..."
14
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
15
Ritul: मासिक पाळीदरम्यान केस का धुवू नयेत? जाणून घ्या शास्त्र आणि विज्ञान!
16
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
17
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
18
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
19
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
20
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना

Ashadhi wari 2025: जवळचे विठ्ठल मंदिर सोडून पंढरपुरी वारी करत जाण्यामागे काय असेल कारण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 07:00 IST

Ashadhi wari 2025: विठ्ठल सगळीकडे सारखाच, हे माहीत असूनही आषाढी एकादशीला वारकर्‍यांचे मन पंढरपुरात का धाव घेते, त्यामागचे कारण जाणून घ्या.

प्रेम हा अत्यंत नाजूक, परंतु तेवढाच गोंधळात टाकणारा विषय. एखाद्या व्यक्तीबद्दल आपल्याला आपुलकी वाटते, की आकर्षण, की प्रेम अशा संभ्रमित अवस्थेत आपण असतो. परंतु, आध्यात्मात प्रेमाची सुंदर व्याख्या दिली आहे, ती म्हणजे `मी तू पणाची झाली बोळवणं' अर्थात दोन जीवांची एकरूपता. बघणाऱ्याला प्रश्न पडावा, आपण दोन व्यक्तींपैकी नेमके कोणाला पाहतोय? ही भावावस्था म्हणजे प्रेम. आपल्याला आवडणारी व्यक्ती, ती नसून आपणच आपल्याला पाहतोय, हा अनुभव, म्हणजे प्रेम. असे प्रेम करावे लागत नाही, ते सहज होत जाते, जसे संत सेना महाराज यांना झाले. हेच प्रेम प्रत्येक वारकऱ्यांच्या मनात असते म्हणून दरवर्षी ते आषाढी एकादशीला(Ashdhi Ekadashi 2025) पंढरपूरच्या ओढीने वारीला जातात. त्याचे वर्णन सेना महाराज करतात... 

जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा,आनंदे केशवा भेटताची।।

संत सेना महाराज ज्या पद्धतीने विठ्ठलाप्रती आपले प्रेम व्यक्त करत आहेत, त्याप्रमाणे आपणही आपल्या प्रेमाची तुलना करून हेच खरे प्रेम आहे का, याची खातरजमा करू शकतो. 

पंढरीला गेल्यावर, आपल्या आनंद सागराला भेटल्यावर, त्यांना अन्य कोणत्याही सुखाची अपेक्षाच राहिलेली नाही. म्हणजेच, आजवर जे शोधत होतो, तेच हे अंतिम सुख, अशी मनाची खात्री पटते. 

या सुखाची उपमा, नाही त्रिभुवनी,पाहिली शोधोनी, अवघी तीर्थे।।

सुखाच्या शोधात माणूस धडपडत असतो. सुख मिळावे म्हणून सर्वतोपरी प्रयत्न करतो. परंतु, सर्व प्रकारची सुखं क्षणिक, क्षणभंगूर वाटू लागतात आणि आपल्या प्रिय विठ्ठलाच्या ठायी शाश्वत सुखाची प्राप्ती होते, तेव्हा मनातले द्वैत संपून अद्वैताचा साक्षात्कार होतो. 

ऐसा नामघोष ऐसे, पताकांचे भार,ऐसे वैष्णव दिगंबर, दावा कोठे।।

प्रेमावस्था अशीच असते. त्या आनंदाच्या भरात प्रत्येक दिवस उत्सवासारखा साजरा करावा, असे वाटू लागते. संत सेना महाराजांनादेखील तसेच झाले आहे. विठ्ठलाच्या दर्शनाला गेल्यावर पंढरपुरातील चैतन्य त्यांना उत्सवाप्रमाणे भासू लागले आहे. असे उत्सवी वातावरण झाल्यावर, दु:खाला आयुष्यात स्थान उरेलच कसे?

ऐसी चंद्रभागा, ऐसा पुंडलिक,ऐसा वेणुनादी, कानी दावा।।

आपण ज्याच्यावर प्रेम करतो, त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला आवडू लागते. नव्हे, तर ती एकमेवाद्वितीय वाटू लागते. 'याचि सम हा!' संत सेना महाराजसुद्धा त्याच प्रेमदृष्टीने पांडुरंगाच्या पंढरीकडे पाहत असताना म्हणतात, अशी निर्मळ चंद्रभागा, असा भक्त पुंडलिक, येथील एकूणच भारावलेले वातावरण, अन्य कोठे सापडेल का? असे ते भारावून म्हणत आहेत. 

ऐसा विटेवरी उभा, कटेवरी कर,ऐसे पाहता निर्धार, नाही कोठे।।    

आपलया प्रेमळ व्यक्तीचे आपल्याला सान्निध्य लाभले, की खूप हायसे वाटते. हर प्रकारच्या संकटाला सामोरे जाण्याचे बळ मिळते.  भले तो कटेवर हात ठेवून, विटेवर उभा असला, तरी केवळ नजरेने 'में हू ना' असा दिलासा देत असेल, तरी आपल्याला खूप आधार वाटतो. तो आधार संत सेना महाराजांना विठ्ठलाच्या ठायी सापडला आहे. 

सेना म्हणे खूण, सांगितली संती,या परती विश्रांती, न मिळे जीवा।।

प्रेमाची ही लक्षणं, संतांनी सांगितली आहेत आणि संत सेना महाराज, ते प्रेम अनुभवत आहेत. असे प्रेम लाभले, की अन्य कोणत्याही गोष्टींची आस उरत नाही. मन शांत होते. आयुष्यात कितीही खडतर प्रसंग आले, तरी या प्रेमाचा क्षय न होता, ते वृद्धिंगत होत जाते आणि चिरंतन आनंद देते. हे सगळं अनुभवण्यासाठी भाविक पंढरपुराकडे धाव घेतात. 

टॅग्स :ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpurपंढरपूर