शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

'जेवढी गोडी पेढ्यात, तेवढीच गोडी रामनामात'; वाचा गोंदवलेकर महाराजांकडून रामनामाचे महत्त्व!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2024 11:19 IST

नामस्मरणाची गोडी कधी व कशी लागेल, त्याचा लाभ कसा होईल, हे गोंदवलेकर महाराजांनी पेढ्याचे गोड उदाहरण देऊन सांगितले आहे. 

देव आमच्या हाकेला कधीच धावून येत नाही. देव आमचे कधीच ऐकत नाही. देवाला आमची काळजीच नाही. अशा कितीतरी गोष्टींनी आपण देवाला बोल लावत असतो. परंतु, ज्यांच्या मदतीला देव धावून गेला, त्यांनी देवाला जशी आर्त साद घातली होती, तशी आपण आर्त हाक मारतो का? तर नाही. देवाचा आपल्याला आठव होतो, आपण आर्त हाकही मारतो, पण कधी? तर आपल्या संकटकाळी. ही स्वार्थी वृत्ती झाली. संत सांगतात, गरज पडल्यावर कोणीही गयावया करेल, परंतु गरज नसतानाही जो आर्त साद घालतो, त्याला खरे प्रेम म्हणावे आणि ते प्रेम जडण्याचे माध्यम आहे, हरीनाम! ६ जानेवारी रोजी गोंदवलेकर महाराजांची पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त जाणून घेऊया राम नामाचे महत्त्व!

ते कसे घ्यावे, असाही आपल्याला प्रश्न पडतो. याबाबत ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सांगतात, 'नाम कसे घेऊ हे विचारणे, म्हणजे पेढा कसा खाऊ असे विचारण्यासारखे आहे. पेढा कोणत्याही बाजूने खाल्ला तरी गोडच लागतो. तसे नाम कसेही घेतले तरी ते आपले काम करतेच करते. पेढा ज्याने खाल्ला आहे, तो पेढा कसा काऊ म्हणून जसे विचारत नाही, तसे नाम घेणारा माणूस नाम कसे घ्यावे हे विचारत नाही. बी शेतात पडते तेव्हा तिचे तोंड वरच्या बाजूला आहे की खाली, हे पाहत नाही. तो आपले काम करत राहतो. अंकुर आपला मार्ग स्वत: काढतो आणि आपली दिशा आपण ठरवतो.'

जितक्या सहजतेने आपण श्वसन करतो, तितक्या सहजतेने नाम घेतले पाहिजे. दमा झालेली व्यक्ती श्वास घेण्यासाठी कोणती दिशा योग्य हे विचारत नाही, तर आपल्यासाठी श्वसनाचा अनुकूल मार्ग शोधते. नाम घेणारी व्यक्तीदेखील श्वासागणिक नामाशी जोडली जाते आणि जेव्हा जेव्हा शक्य तेव्हा नाम घेत राहते. 

नामस्मरण करण्यासाठी ठराविक मुद्रा हवीच असेही नाही. गोंदवलेकर महाराज सांगतात, 'समजा, तुम्ही पद्मासन घालून नामस्मरणाला बसलात आणि काही वेळाने पाठीला रग लागली, तर नामाकडे कमी आणि देहाला होणाऱ्या यातनांकडे तुमचे लक्ष जाईल. नाम असे घ्यावे, जिथे देहाचा विसर पडेल.'

नाम कधी घ्यावे, कधी नाही, याबाबत बंधने आहेत का? तर नाही. कोणत्याही परिस्थितीत जितक्या सुलभतेने श्वसन सुरू असते, तितक्याच सुलभतेने नाम घेत राहावे. विटाळ देहाला असतो, मनाला नाही. सोहेर-सुतक देहाला असते, मनाला नाही. रोग-आजार देहाला असतात, मनाला नाही आणि नाम हे मनाने घ्यायचे आहे, देहाने नाही. मन हे आत्म्याशी जोडलेले असते, बुद्धी नाही. म्हणून आत्म्याचा आणि परमात्म्याचा संबंध जोडायचा असेल, तर नामरूपी पेढा खाताना विचार करू नका, त्याची गोडी चाखत राहा.