शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

प्रेम विवाह करूनही घरात वादावाद होत आहेत? मग 'हे' उपाय जरूर करून पहा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2021 08:00 IST

भांडणं लुटुपुटुची असतील तर ठीक, पण या वादांनी टोक गाठले, तर प्रेमभंग आणि पुढे विवाहभंग होण्यापर्यंत मजल जाते. वास्तू शास्त्राने यावर काही उपाय सांगितले आहेत, ते करून पहा. 

असे म्हटले जाते की ते प्रेम करणे सोपे आहे, परंतु प्रेम मिळविणे कठीण आणि मिळाले तर टिकवून ठेवणे त्याहून कठीण आहे. या सर्व अडचणींवर मात केल्यानंतर, लोक प्रेम विवाह करतात परंतु तरीही ते आनंदी नाहीत असे दिसून येते. २४ तास एकत्र राहिल्यानंतर, ते एकमेकांचे दोष काढण्यास सुरुवात करतात आणि त्यांच्यामध्ये क्षणो क्षणी भांडणे सुरू होतात. ही भांडणं लुटुपुटुची असतील तर ठीक, पण या वादांनी टोक गाठले, तर प्रेमभंग आणि पुढे विवाहभंग होण्यापर्यंत मजल जाते. वास्तू शास्त्राने यावर काही उपाय सांगितले आहेत, ते करून पहा. 

या उपायांसह प्रेम विवाहातील समस्या दूर करा 

>> लग्नानंतर रोजचे वाद होत असतील, तर गरजूंना कणिक आणि तेलाचे दान करा. हा उपाय केवळ प्रेम विवाह झालेल्यांनाच नाही तर ठरवून विवाह केलेल्यांनाही वापरता येईल. या उपायाने वाद कमी होऊन परस्परांचे संगनमत होण्यास मदत होते. मात्र हे दान करताना नवरा बायको एकत्र असणे गरजेचे आहे. 

>> लग्नसंबंध पुन्हा सुधारण्यासाठी तुम्ही जोडीदाराला एखादी भेट वस्तू देणार असाल, तर ती वस्तू काळया किंवा निळ्या रंगाची असणार नाही याची काळजी घ्या. हे रंग नात्यावर नकारात्मक परिणाम करतात. 

>> दररोज मीठ मिश्रित पाण्याने फरशी पुसा. याशिवाय रोज सायंकाळी कापूर जाळण्याने नकारात्मक उर्जा दूर होईल. 

>> दर शुक्रवारी राधा-कृष्णाच्या मंदिरात जा. तेथे पिवळ्या रंगाची फुले व खडीसाखर अर्पण करा, यामुळे विवाहातील अडचणी दूर होतील.

>> आपल्या शयन कक्षात अर्थात बेडरूममध्ये राधा कृष्णाची मूर्ती, तसबीर किंवा मोरपीस लावा. त्यामुळेही सकारात्मक वातावरण होऊन वाद निवळतो. 

>> बेडरूममध्ये घरात वापरण्याच्या चपलाही वापरू नका. त्या खोलीबाहेर ठेवा. तसेच मोबाईल, लॅपटॉप इ. गॅझेट खोलीबाहेर ठेवून नात्याला वेळ द्या.