शहरं
Join us  
Trending Stories
1
"ती शिवसेनेकडून झालेली मोठी चूक..., राज ठाकरे अध्यक्ष झाले असते, तर आज शिवसेनेचे दोन तुकडे झाले नसते!"
2
काँग्रेस सोडायची वेळ का आली? संग्राम थोपटेंनी यादीच वाचली; भाजपा प्रवेशाची तारीखही सांगितली
3
चालताना छत्रीचा धक्का लागल्याने गर्दुल्ल्याचा महिलेवर हल्ला, वरळी सी फेसजवळील घटना
4
डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण; चिठ्ठी सापडली..आत्महत्येचे कारण आलं समोर?
5
“राज यांच्यासोबत जाताना उद्धव ठाकरे काँग्रेस-शरद पवार गटाला सोडणार का?”; शिंदेसेनेचा सवाल
6
डेपोर्टेशन, ट्रेड डील...या विषयांवर चर्चा होणार का? जेडी व्हेन्सच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसचे सरकारला प्रश्न
7
“भाषा सक्तीबाबत निर्माण झालेला मराठी-हिंदी वाद निरर्थक, महायुती सरकारने...”: दीपक केसरकर
8
महिलांशी अवैध संबंध, हुंड्यासाठी छळ आणि मारहाण; अमित मिश्राच्या पत्नीचे खळबळजनक आरोप
9
वक्फ कायद्याविरोधात AIMPLB चा 'ब्लॅकआउट' प्लॅन...; हैदराबादमध्ये मुस्लीम नेते-धर्मगुरू एकवटले, ओवेसी म्हणाले आम्ही...!
10
जेनसोलच्या पुण्यातील प्लाँटमध्ये एनएसईचा अधिकारी पोहोचला; होते फक्त तीन मजूर, परिस्थिती पाहून...
11
१ मेपासून फास्टॅग फाडून टाकणार? सॅटेलाईटवर टोल कापला जाणार; NHAI पहा काय म्हणतेय...
12
Video : दोन्ही फलंदाज नॉन स्ट्राइक एन्डला! Run Out चा डाव साधल्यावर कोहलीनं 'गॉगल' काढला, अन्...
13
राज ठाकरेंशी युती करण्याची चर्चा ठाकरे गट शिवतीर्थावर जाऊन करणार का? संजय राऊत म्हणाले...
14
'हलक्यात घेऊ शकत नाही' चेन्नईविरुद्धच्या सामन्याआधी रोहितचा मुंबईला इशारा, धोनीबाबत म्हणाला...
15
मोदी-नितीश फक्त सत्तेसाठी एकत्र; मल्लिकार्जुन खरगेंचा BJP-JDU युतीवर निशाणा
16
“हिंदीची सक्ती नकोच”; मनसेची थेट RSSकडे धाव, मोहन भागवतांना खुले पत्र, नेमकी काय मागणी केली?
17
रणजीत कासलेंना निवडणुकीत परळीला ड्युटीच नव्हती; प्रशासनाकडून निवडणूक आयोगाला अहवाल
18
दररोज ४५ रुपये गुंतवून लखपती व्हा; LIC च्या 'या' योजनेत तुम्हाला विमा आणि बोनसही मिळतो
19
सेक्सटॉर्शन, तरुणाचे अश्लील फोटो व्हायरल ! महिलेसह दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा
20
अजित पवारांचे हेलिकॉप्टर बिघडले, राष्ट्रवादीचा मेळावा रद्द; कार्यकर्त्यांमध्ये रंगली वेगळीच चर्चा

Angarki Chaturthi 2023: गणपती अथर्वशीर्ष हा सिद्ध मंत्र असून याच्या नित्य पठणाने होणारे लाभ जाणून घ्या!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Updated: January 10, 2023 11:21 IST

Angarki Sankashti Chaturthi 2023: आज अंगारकीनिमित्त अथर्वशीर्षाचे पारायण तर कराच, मात्र ते दररोज म्हटल्यामुळे होणारे फायदेही जाणून घ्या. 

>> ज्योत्स्ना गाडगीळ 

गणक ऋषींनी लिहिलेले गणपती अथर्वशीर्ष स्तोत्र हा एक सिद्ध मंत्र आहे. या स्तोत्रात गणरायाच्या अमूर्त स्वरूपाचे वर्णन केले आहे. अर्थात आपण पाहतो तेवढेच गणेशाचे स्वरूप मर्यादित नाही, तर तो चराचरात, कणाकणात सामावला आहे. हे सांगताना गणक ऋषी म्हणतात तू ब्रह्म, तू विष्णू, तू रुद्र, तू इंद्र... एवढेच काय तर आमच्या मूलाधार चक्राशी तुझा नित्य वास असतो. असा गणपती बाप्पा आपल्या सदा सर्वदा सन्निध असतो. त्याची प्रार्थना करणारे हे स्तोत्र आपल्याला आत्मरुपाची प्रचिती देणारे आहे. ते रोज म्हटल्यामुळे होणारे लाभ जाणून घेऊ. 

अथर्व या शब्दाचा अर्थ आहे, थर्व म्हणजे चंचल आणि अथर्व म्हणजे जे चंचल नाही ते. शीर्ष म्हणजे डोकं. आपलं डोकं शांत असेल तर आणि तरच आपण योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ शकतो. त्यामुळे अथर्वशीर्षाचा पहिला लाभ म्हणजे आपले चित्त शांत होते, ज्या डोक्यात विचारांचे वादळ सुरु असते ते वादळ या स्तोत्रपठणाने स्थिर होते. यासाठी ते स्तोत्र शांतचित्ताने म्हटले पाहिजे. उरकून टाकल्यासारखी घोकमपट्टी केली तर त्याचा उपयोग नाही. त्याचे उच्चार, अर्थ समजून उमजून म्हटले तर त्याचा प्रभाव पडेल आणि त्याचा लाभ जाणवेल. 

हे स्तोत्र अथर्ववेदाशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व अधिक आहे. त्यात ''गं'' चा उच्चार वारंवार आढळतो. गं हा शब्द नसून हा महामंत्र आहे. त्यात ताकद एवढी आहे, की गणपती अथर्वशीर्षाचे सहस्त्रावर्तन केले असता इप्सित मनोकामना पूर्ती होते असे या स्तोत्राच्या फलश्रुतीमध्ये म्हटले आहे. यासाठी अनेक जण संकष्टीच्या निमित्ताने पुरोहितांकडून सहस्रावर्तन करवून घेतात. त्यासाठी काही नियम प्रकर्षाने पाळले पाहिजेत. ते पुढीलप्रमाणे-

- स्तोत्राचे उच्चार स्पष्ट हवेत. - काम करता करता म्हणण्याचे हे स्तोत्र नाही. देवासमोर बसून एक तल्लीन होऊन हे स्तोत्र म्हटले किंवा ऐकले पाहिजे. - पूर्व दिशेला सुखासनात अर्थात मांडी घालून आसनावर बसून हे स्तोत्र म्हणावे. - स्तोत्र म्हणताना इतर गोष्टी बोलू नयेत. - स्तोत्राचे पावित्र्य जपण्यासाठी शुचिर्भूतता पाळावी. - गणेशाची पूजा करून त्याला वंदन करून स्तोत्र पठणाला सुरुवात करावी. - स्तोत्र पाठ नसेल तर स्तोत्र श्रवण करा, डोळ्यासमोर स्तोत्राचे शब्द ठेवा. जेणेकरून मन भटकणार नाही आणि पठणाचा उद्देश पूर्ण होईल. - स्तोत्राची आवर्तने करताना फलश्रुती सर्वात शेवटी एकदाच म्हणावी. - सहस्त्र आवर्तने शक्य नसतील तर ३,७,९,११, २१ वेळा आवर्तने करावीत. मात्र जेवढे म्हणाल तेवढे मनापासून म्हणा, तरच लाभ होईल.   

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थीganpatiगणपती