शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण द्यायचं, आंदोलन मोडायचं, की मला गोळ्या घालायच्या...; मनोज जरांगे-पाटील यांचा थेट इशारा
2
ऐन गणेशोत्सवात लालबागला जाणाऱ्या प्रवाशांचा होणार खोळंबा : ब्लॉकमुळे चिंचपोकळी, करीरोड स्टेशनवर लोकल नसणार!
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा पूर्ण होणार, प्रत्येक कोपऱ्यात मराठे दिसणार! मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?
4
उधारीच्या वादातून वाहन विक्रेत्याचे अपहरण, मारहाणीचा व्हिडीओ स्नॅपचॅटवर अपलोड!
5
नागपूर हादरले! चाकू काढला आणि छातीवर सपासप वार; दहावीतील विद्यार्थिनीची शाळेसमोरच हत्या
6
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
7
भारतावरील 'टॅरिफ' रशियन तेलामुळे नाही, तर ट्रम्प यांच्या नाराजीमुळे; अमेरिकन कंपनीचा दावा
8
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
9
मुंबईतील 'या' ठिकाणी लोक पैसे देऊन तासभर रडतात, प्रवेशासाठी होते गर्दी; काय आहे रुईकात्स?
10
Asia Cup 2025 : सिंग इज किंग! हरमनप्रीतची हॅटट्रिक; अखेरच्या टप्प्यात चीनचा करेक्ट कार्यक्रम
11
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
12
"मला माझ्या नवऱ्यापासून वाचवा..."; महिलेने कारमधून मारली उडी, रस्त्यावरच घातला गोंधळ
13
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
14
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
15
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
16
पंतप्रधान मोदींना जपानमध्ये मिळाली 'दारुम डॉल'; काय आहे या बाहुलीचा भारताशी संबंध?
17
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेसच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
18
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
19
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
20
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?

Angaraki Chaturthi 2023: समस्त इच्छांच्या पूर्ततेसाठी अंगारकीला करा दुर्वांचे 'हे' विशेष उपाय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2023 06:50 IST

Angaraki Sankashti Chaturthi 2023: बाप्पा आपल्या पाठीशी नेहमी उभा राहतो, इच्छापूर्ती करतो, त्यासाठी आपणही दिलेल्या पद्धतीने बाप्पाची मनोभावे सेवा करूया!

मंगळवार , १० जानेवारी रोजी २०२३ या इंग्रजी वर्षातली पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळावा म्हणून भाविक प्रार्थना करतात. तसेच उपवास करतात आणि गणपतीची पूजा करतात. तसेच बाप्पाच्या आवडत्या वस्तू, पदार्थ अर्पण केल्या जातात. या सर्व उपचारामुळे बाप्पा प्रसन्न होतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

बाप्पाच्या आवडत्या दुर्वांशिवाय गणेश पूजा अपूर्ण मानली जाते. म्हणून जेव्हा जेव्हा गृहप्रवेश, मुंज, विवाह इत्यादी शुभ कार्य केली जातात तेव्हा गणेश पूजेला दुर्वा वापरल्या जातात. याशिवाय बुधवार आणि चतुर्थीच्या पूजेतही दुर्वा वापरतात. या दिवशी दुर्वाचे काही उपाय खूप चमत्कारिक ठरतात. चला जाणून घेऊया या चमत्कारिक उपायांबद्दल.

उपाय जाणून घेण्याआधी दुर्वा वाहण्याबद्दल थोडेसे: गणेश पूजेत दुर्वा, विष्णू पूजेत तसेच सत्य नारायण पूजेत तुळशी दल, शंकराला बिल्व पत्राचा अभिषेक कशासाठी? तर त्यानिमित्ताने पूजेत आपले लक्ष केंद्रित व्हावे आणि मन स्थिर व्हावे. आपण गवताला दुर्वा म्हणत नाही, तर गवतातून निवडलेल्या त्रिदलाला दुर्वा म्हणतो आणि त्या बाप्पाला अर्पण करतो. याचाच अर्थ हे काम अतिशय मन लावून करायचे आहे. मन एकदा का शांत आणि एकाग्र झाले की पुढचे मार्ग आपोआप मोकळे होत जातात आणि चमत्कारही आपोआप घडतात. यासाठीच हे पुढील उपाय... 

संकष्टी चतुर्थीच्या दिवशी दुर्वा वापरण्याच्या पद्धती: 

- जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल आणि तुमच्याकडे पैसा नसेल तर गणेश चतुर्थी किंवा कोणत्याही शुभ मुहूर्तावर पाच दूर्वामध्ये दोऱ्याला ११ गाठी  घालून तो दुर्वांचा छोटासा हार बाप्पाला अर्पण करावा. असे केल्याने आर्थिक संकटातून लवकर सुटका होते.

- आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी गाईच्या दुधात दुर्वा मिसळून त्यापासून तयार केलेले गंध कपाळाला लावा. असे केल्याने तुमची इच्छा लवकरच पूर्ण होईल.

- ज्योतिष शास्त्रानुसार घरातील संकटातून सुटका होण्यासाठी दररोज गायीला चारा तसेच दुर्वा खाऊ घाला. असे केल्याने कौटुंबिक नात्यांमध्ये प्रेमभावना वाढते.

- गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला २१ दुर्वांचे त्रिदल अर्पण करा. त्याबरोबर अथर्व शीर्षाची २१ आवर्तने म्हणा किंवा श्रवण करा. त्यामुळेदेखील गणेशकृपा प्राप्त होते. 

- गणेशाच्या पूजेमध्ये दुर्वा वापरल्याने आर्थिक उणीव भासत नाही. उलट आपल्या कामात यश मिळून कुबेराप्रमाणे धन प्राप्त होते, असे मानले जाते.

- बुधवारी किंवा चतुर्थीला गणेश मंदिरात ११ दुर्वांच्या जुडी अर्पण केल्याने बुध दोष दूर होतो आणि गणेश कृपा होते.  

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी