शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

Angarak Chaturthi 2021 : आपल्या मनोकामना बाप्पाने पूर्ण कराव्यात, यासाठी अशी करा अंगारकीला उपासना... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2021 08:00 IST

Angarak Chaturthi 2021: बाप्पा हा मंगलमूर्ती आहेच तसेच तो विघ्नहर्ता सुद्धा आहे. आपल्या आयुष्यातील अडचणींवर मात करण्यासाठी  अंगारकीला बाप्पाकडे अशा प्रकारे साकडे घाला. 

प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. त्यातही चतुर्थीची तिथी जेव्हा बाप्पाच्या आवडत्या मंगळवारी येते तेव्हा तो अंगारक योग म्हटला जातो. २३ नोव्हेंबर रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी आहे. ही तिथी गणपती बाप्पाला समर्पित आहे. या दिवशी विधानहर्ता गणपतीची विधिवत पूजा करून उपवास केल्याने जीवनातील सर्व अडचणी दूर होतात, प्रत्येक कार्यात यश प्राप्त होते. यासोबतच बाप्पा आपल्या मनोकामनाही पूर्ण करतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. 

ही चतुर्थी वैशिष्ट्यपूर्ण आहे

मंगळवारी येणारी चतुर्थी अत्यंत शुभ मानली जाते. याला अंगारकी संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. ज्यांना चतुर्थीचे व्रत सुरू करायचे आहे, त्यांनी अंगारकी संकष्टी चतुर्थीपासूनच हे व्रत सुरू करावे. २३ नोव्हेंबर रोजी येणारी अंगारकी २२ नोव्हेंबर (सोमवार) रोजी रात्री १०. २६ मिनिटांनी सुरू होईल आणि २३ नोव्हेंबर (मंगळवार) रोजी दुपारी १२. ५५ वाजता समाप्त होईल. २३ नोव्हेंबर रोजी रात्री ०८. २७ मिनिटांनी चंद्रोदय होईल.

संकष्टी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करावीत. शक्य असल्यास या दिवशी पुरुषांनी पितांबर व स्त्रियांनी पिवळे वस्त्र परिधान करावे. यानंतर देवासमोर हात जोडून प्रार्थना करावी. या दिवशी कोणतेही धान्य खाऊ नये. चंद्रोदयानंतरच उपवास सोडावा. गणपतीची षोडशोपचार पूजा करावी. त्याला दुर्वा,  फळे, फुले, चंदन अर्पण करावे. उदबत्ती लावावी. जास्वंद, लाल फुले व मोदक किंवा बेसनाचे लाडू देवाला अर्पण करावेत. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी चंद्रोदयानंतर आरती करून उपवास सोडावा. या दिवशी श्रीगणेशाच्या मंत्रोच्चारांसह श्री गणेश स्तोत्राचे पठण करावे. जमल्यास अथर्वशीर्षाची आवर्तने करावीत किंवा पाठ नसल्यास श्रावण करावीत. देवाला आपला मनोदय सांगून आपले इप्सित कार्य पूर्ण व्हावे म्हणून प्रार्थना करावी. 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी