शहरं
Join us  
Trending Stories
1
कष्टकऱ्यांचा आधारवड काेसळला: डाॅ. बाबा आढाव यांचे निधन, वयाच्या ९५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
वंचित, कष्टकऱ्यांसाठी लढणारा महान संघर्षयोद्धा हरपला; बाबा आढाव यांच्या निधनानंतर पवार-फडणवीसांकडून म्हणून श्रद्धांजली
3
"ठाकरे ब्रँड एकच होता, सध्या राज ठाकरेंचा वापर करून..."; CM देवेंद्र फडणवीसांचे रोखठोक मत
4
"असदुद्दीन ओवेसींचे पूर्वज हिंदू होते, ब्राह्मण कुटुंबात झाला होता जन्म" बृजभूषण शरण सिंह यांचा दावा 
5
IndiGoला मोठा दणका! CEO, COO, बड्या अधिकाऱ्यांना DGCA कडून समन्स, उद्या सकाळी चौकशी
6
“धर्मवीर ३ ची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल, आनंद दिघे...”; एकनाथ शिंदेंनी सांगितले ‘राज’कारण
7
बाबरी मशिदीचे भूमिपूजन करणाऱ्या हुमायूं कबीर यांचा मोठा 'यू-टर्न'; आता काय म्हणाले?
8
1 रुपये 34 पैशांच्या शेअरची कमाल, ₹90 वर गेला भाव, खरेदीसाठी लोकांची झुंबड; आता कंपनीनं केली मोठी घोषणा!
9
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? युतीच्या चर्चांवर जयंत पाटलांकडून मौन; म्हणाले, "याचं उत्तर शोधणार नाही"
10
गोवा अग्निकांडाचे आरोपी इंडिगोच्या फ्लाईटने फुकेतला पसार; पोलीस पोहोचण्याआधीच काढला पळ
11
“...तर २०२९ मध्ये महायुतीच्या हातातून सत्ता जाऊ शकते, मराठे सोपे नाहीत”: मनोज जरांगे पाटील
12
जपानच्या उत्तर किनाऱ्यावर ७.२ रिश्टर स्केलचा तीव्र भूकंप; ३ मीटर उंचीच्या त्सुनामीचा इशारा
13
"कोण बसवणार आहे मला? काय बोलताय"; 'वंदे मातरम्'वर बोलत असताना राजनाथ सिंह प्रचंड भडकले
14
'क्वीन इज बॅक'..! कणखर मानसिकतेची 'रन'रागिणी! स्मृती मानधना पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत
15
“मंत्री येणार म्हणून फक्त देखावा नको, ३६५ दिवस प्रवाशांना सेवा द्या”: मंत्री प्रताप सरनाईक
16
लग्न करताच 'या' कपलला मिळतात 2.5 लाख रुपये, 90% लोकांना ही योजनाच माहीत नाही!
17
VIDEO: नववधूला सरप्राईज! शेजारी बसलेला नवरदेव अचानक उठला अन् सुरु केला भन्नाट डान्स
18
भाजपाच्या मित्रपक्षातील नेत्याचे बाबरी मशि‍दीला समर्थन; म्हणाले, “मुस्लीम समजाला अधिकार...”
19
"जेवढ्या दिवसांपासून मोदी PM आहेत, जवळपास तेवढे दिवस नेहरू जेलमध्ये होते"; 'वंदे मातरम'वरील चर्चेदरम्यान प्रियांका गांधींचा निशाणा
20
निवृत्तीसाठी कोणता फंड सर्वोत्तम? EPF, PPF की NPS? कोणासाठी कोणती योजना चांगली? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

अनंत चतुर्दशी २०२५: ७ शुभ मुहुर्तावर द्या गणपती बाप्पाला निरोप; ‘या’ मंत्रांनी कल्याण होईल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2025 11:19 IST

Anant Chaturdashi 2025 Ganpati Visarjan Shubh Muhurat: राहु काळ कधी आहे? यंदा २०२५ च्या अनंत चतुर्दशीला मृत्यू पंचक आहे. गणपती विसर्जनासाठी दिवसभर शुभ मुहूर्त सांगितले आहेत. जाणून घ्या...

Anant Chaturdashi 2025 Ganpati Visarjan Shubh Muhurat: ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे.  सार्वजनिक आणि हजारो घरगुती गणपती बाप्पांना या दिवशी निरोप दिला जातो. गणेश चतुर्थीला आगमन झालेल्या गणपतीचे विसर्जन करताना घरातील वातावरण अगदी भावपूर्ण झालेले असते. गणपती बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप दिला जातो. दीड दिवसाचा, पाच दिवसाचा, सात दिवसाचा किंवा अगदी दहा दिवसाचा गणपती असला, तरी लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देताना खूप वाईट वाटते. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशी आर्त विनवणी केली जाते. यंदा २०२५ च्या अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पांना निरोप देण्यासाठी दिवसभर कोणते शुभ मुहूर्त आहेत, ते जाणून घेऊया...

अनंत चतुर्दशी २०२५: गणपती उत्तरपूजेला गुरुजी मिळत नाही? ‘असे’ करा विसर्जन पूजन, पाहा, विधी

यंदा, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अनंत चतुर्दशी आहे. शुक्रवार, ०५ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०३ वाजून १२ मिनिटांनी भाद्रपद शुद्ध चतुर्दशीची सुरुवात होत आहे. तर, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी मध्यरात्री ०१ वाजून ४१ मिनिटांनी अनंत चतुर्दशी समाप्त होईल. परंतु, शनिवार, ०६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.२२ वाजेपासून पंचक सुरू होत आहे. या दिवशी राहु काळ सकाळी ०९ ते १०.३० या कालावधीत आहे. 

अनंत चतुर्दशी २०२५ गणपती विसर्जन शुभ मुहूर्त

- शुभ चौघडिया मुहूर्त: सकाळी ७ वाजून २६ मिनिटे ते ९ पर्यंत.

- अमृत काळ: दुपारी १२ वाजून ५० ते २ वाजून २३ मिनिटे.

- लाभ चौघडिया मुहूर्त: दुपारी १ वाजून ५४ मिनिटे ते ३ वाजून २८ मिनिटे.

- अमृत चौघडिया मुहूर्त: दुपारी ३ वाजून २८ मिनिटे ते सायंकाळी ५ वाजून ०३ मिनिटे.

- सायंकाळी गोधूलि मुहूर्त: ६ वाजून ३७ मिनिटे ते ७ वाजता.

- सायंकाळी लाभ चौघडिया मुहूर्त: ७ वाजता ते ८ वाजून ०३ मिनिटे.

- सायंकाळी शुभ चौघडिया मुहूर्त: रात्रौ ९ वाजून २९ मिनिटे ते १० वाजून ५५ मिनिटे.

मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!

अनंत चतुर्दशी २०२५ गणपतीला निरोप देताना नामस्मरण अवश्य करा

बाप्पाची यथासांग पूजा करून त्याला प्रिय लाडू, मोदकांचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्व भाविकांना वाटा. बाप्पाचे विसर्जन करण्याआधी बाप्पाच्या सान्निध्यात काही काळ शांत बसून 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा जप करा. या मंत्राचा जप करून झाल्यावर पुढील मंत्र म्हणत बाप्पाला दुर्वांची जुडी अर्पण करा. 

- ॐ गणाधिपाय नम:- ॐ उमापुत्राय नम:- ॐ विघ्ननाशनाय नम:- ॐ विनायकाय नम:- ॐ ईशपुत्राय नम:- ॐ सर्वसिद्धप्रदाय नम:- ॐ एकदन्ताय नम:- ॐ इभवक्त्राय नम:- ॐ मूषकवाहनाय नम:- ॐ कुमारगुरवे नम:

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या...!!!

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2025Ganesh Visarjanगणेश विसर्जनPuja Vidhiपूजा विधीGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपती 2025Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५chaturmasचातुर्मासspiritualअध्यात्मिक