शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

Anant Chaturdashi 2023: घरच्या घरी करा गणपतीची विसर्जन पूजा; ‘हा’ मंत्र अत्यंत महत्त्वाचा! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 14:36 IST

Anant Chaturdashi 2023: अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना विधीपूर्वक उत्तर पूजा करावी, असे सांगितले जाते. जाणून घ्या...

Anant Chaturdashi 2023: पाहता पाहता यंदाच्या गणेशोत्सवाची सांगता होत आहे. २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. या दिवशी दहा दिवसांच्या घरगुती आणि सार्वजनिक मंडळातील गणपतींना भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जातो. गणपती आगमनावेळी पार्थिव गणेश पूजन केले जाते, तसे अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देताना उत्तर पूजा करण्याची प्रथा परंपरा आहे. या दिवशी गणपती बाप्पाला निरोप देताना कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे पूजन करण्यासह काही विधी करावेत, असे म्हटले जाते. जाणून घेऊया...

देशातील कोट्यवधी घरांमध्ये गणपतीचे पूजन केले जाते. काही ठिकाणी दीड दिवस, पाच दिवस, गौरी-गणपती, सात दिवस गणपती पूजन केले जाते. अनेक घरांमध्ये अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश पूजन करण्यात येते. गणेश चतुर्थीला स्थापन केलेल्या गणपतीचे विसर्जन अनंत चतुर्दशीला केले जाते. पार्थिव गणेशाची प्राणप्रतिष्ठा करण्याचा विशिष्ट पूजाविधी असतो. तसेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन करण्यापूर्वी पार्थिव गणपती मूर्तीची विसर्जन पूजा केली जाते. या दिवशी विधिवत गणरायाला निरोप दिल्याने पुण्य प्राप्ती होते. घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते, असे सांगितले जाते. (Anant Chaturdashi 2023: Ganpati Visarjan Puja Vidhi With Mantra)

अनंत चतुर्दशीला करावयाचा पूजा विधी

- सकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे गणपतीची षोडशोपचार पूजा करावी.

- गणपतीला आवडणारे मोदक, लाडू, मिठाई यांचा नैवेद्य दाखवावा.

- गणपतीला नवीन वस्त्रे अर्पण करावीत.

- एका कापडात सुपारी, दुर्वा, मिठाई आणि काही पैसे घ्यावेत. या वस्तू त्या कापडात गुंडाळून गणपतीच्या मूर्तीजवळ ठेवाव्यात.

- विसर्जनापूर्वी गणपतीची मनोभावे आरती आणि जयजयकार करावा.

- गणेशोत्सव काळात अनावधानाने झालेल्या चुकांबाबत गणपतीकडे क्षमायाचना करावी.

- गणपतीच्या मूर्तीसह पूजा साहित्य, हवन साहित्य आणि अन्य वस्तू विसर्जित कराव्यात.

अनंत चतुर्दशीचा गणपती विसर्जन मंत्र

यातुं देवगणा: सर्वे पुजामादाय पार्थिवीम।इष्टकामप्रसिद्ध्यर्थ पुनरागमनाय च।।

गणपतीची प्रार्थना झाल्यावर असा मंत्र म्हणून मूर्तीला अक्षता अर्पण कराव्यात. म्हणजे पूर्वी प्राणप्रतिष्ठेने आलेले देवत्व विसर्जित होते. त्यानंतर मूर्ती स्थिर आसनावरून थोडी पुढे सरकवून ठेवावी. मग मूर्ती उचलून समुद्रात किंवा कुळाचाराप्रमाणे योग्य त्या पवित्र स्थळी विसर्जित करावी. यावेळी काही ठिकाणी गणपतीच्या हातावर दही, लाह्या देण्याची परंपरा आहे. आपापले कुळधर्म, कुळाचाराप्रमाणे गणपती बाप्पाला निरोप द्यावा, असे म्हटले जाते. 

गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या!!! 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीganpatiगणपतीGanpati Festivalगणेशोत्सव