शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग: श्रीराम आम्हाला देतो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 03:33 IST

शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात.

मोहनबुवा रामदासीआम्ही काय कुणाचे खातो। श्रीराम आम्हाला देतो।जो अन्न देतो उदरासी। शरीर विकावे लागे त्यासी।मां जेणे घातले जन्मासी। त्यासी कैसे विसरावे।।मातेच्या उदरातून हा जीव म्हणून जेव्हा बाहेर आला, त्या क्षणापासून ईश्वराने त्याच्या जीवनाची चिंता वाहिलेली असते. खरंतर जीव जन्माला घालण्यापूर्वी भगवंताने त्या जिवाच्या सर्व व्यवस्था व अवस्था निश्चित करून अधोरेखित केलेल्या असतात. या जीवसृष्टीवर भगवंताची एकमेव सत्ता आहे. त्या भगवंताच्या ऋणात राहणं हेच साधकाचं प्रथम कर्तव्य असतं. अन्नाचा कण ज्याने निर्माण केला, त्या ईश्वराने केवळ माणूसच नव्हे, तर सृष्टीतील सर्व जीव, जंतू, पशू, पक्षी आणि प्राण्यांच्याही उदरनिर्वाहाची काळजी घेतलेली असते. दुर्दैवाने या पशू, पक्षी, प्राण्यांना बुद्धी नाही असे म्हणतात; परंतु हेच पशुपक्षी बुद्धीचे वरदान माणसांपेक्षा कमी असूनही निसर्गाचे नियम पाळतात. मात्र, माणूस असूनही तो निसर्गाचे नियम नीट पाळत नाही. म्हणून तर निसर्गाचे संतुलन ढळलेले आपल्याला पाहायला मिळते. शरीरच त्या ईश्वराने निर्माण केल्यामुळे त्याच्या अन्न, वस्त्र, निवाऱ्याची व्यवस्था ईश्वराने केलेली असते. चिमण्या, पाखरंही आपल्या चोचीतून पिलाला घास भरवतात. त्यामागे ईश्वर नावाची शक्ती मातेच्याच रूपात असते. तीच प्रत्येक जिवाला आई म्हणून घास भरवते. म्हणूनच ‘आम्ही काय कुणाचे खातो, तो राम आम्हाला देतो’ या विचारांचा प्रभाव मनावर असावा आणि आपल्या गरजा मर्यादित ठेवाव्या. गरजांचा डोंगर वाढला की, दु:ख पदरी पडत असतं. म्हणून प्रत्येक घास घेताना हा घास त्या रामाने माझ्यासाठी निर्माण केला आहे हा भाव असावा. त्यासाठी प्रयत्न, जिद्द ही हवीच! नाहीतर ‘असेल माझा हरी, तर देईल खाटल्यावरी’ या निष्क्रिय भावनेचा जाणीवपूर्वक त्याग करावा व हे सर्व रामाचे आहे, त्याने निर्माण केलेलं आहे, तो मला कधीच उपाशी ठेवणार नाही ही श्रद्धा व हा भाव असावा.