शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आनंद तरंग : दिव्यत्वाची प्रचिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 03:01 IST

विश्वाच्या पसाऱ्यामध्ये या सा-याला शून्य किंमत आहे. जिवाचे अस्तित्व आणि ऊर्जा या गोष्टींसाठी व्यर्थ घालवणे म्हणजे अनमोल आयुष्यातील उत्कट आनंदाचे क्षण वाया घालवणे, हे त्यालापटलेले असते.

- इंद्रजित देशमुखज्या व्यक्तीमध्ये निर्भयता आणि नम्रता ठायी ठायी अनुभवायला येते, त्याने पूर्णत्वाचा अधिकार प्राप्त केलेला असतो. निर्भयता यामुळे असते की, भयाची जी कारणे आहेत ती सर्व तकलादू आहेत. तत्कालीन आहेत. याला त्याने जाणलेले असते. अपयशाचे, अपमानाचेआणि मृत्यूचे भय याची मुळापासून जाणत्याला आलेली असते. विश्वाच्या पसाऱ्यामध्ये या सा-याला शून्य किंमत आहे. जिवाचे अस्तित्व आणि ऊर्जा या गोष्टींसाठी व्यर्थ घालवणे म्हणजे अनमोल आयुष्यातील उत्कट आनंदाचे क्षण वाया घालवणे, हे त्यालापटलेले असते. म्हणून तो प्रत्येक क्षण क्षुद्रतेमध्ये व्यतीत न करता, व्यापकतेत, समग्रतेत आणि उमदेपणाने व्यतीत करतो. प्रतिक्षण जगणे आणि सोडून देणे, हे त्याला अवगत झालेले असते. हे मूलभूत ज्ञान झाल्यानंतर त्याला काय गवसते, याबद्दल माउली म्हणतात, ‘ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे।जिथे शांतीचा अंकुर फुटे।।’ तो प्रशांतहोतो. त्याला अखंड विश्वाच्या विराटतेचा अनुभव आल्यामुळे स्वत:च्या अस्तित्वाचे खुजेपण आणि क्षणभंगुरपण समजलेलेअसते. म्हणून तो खूप विनम्र असतो. त्याचा शब्द, त्याचे चालणे, बोलणे, बसणे, उठणे यांमध्ये प्रचंड मृदुता आलेली असते. त्याच्या जगण्यातल्या कोमलतेत एक संगीताची लय आलेली असते. तो ज्या दिशेला जातो, ती दिशा स्नेहाने आणि प्रेमाने भारावून टाकतो. त्याच्या जगण्याचे प्रबंध आता फक्त उपकारासाठीच शिल्लक असतात. तो ज्या दिशेला जातो,ती दिशा उजळून जाते. त्याची पाऊले ही अनेकांना मार्गदर्शक ठरतात. त्याचा सहवासहा दिव्यत्वाने भारलेला असतो. व्यापकता, नम्रता, निरागसता, निरामयता यांची प्रत्यक्ष प्रचिती त्याच्या सहवासात येते आणि अशा दिव्यत्वाच्या ठायी आपले हात आपोआप जुळतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक