शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

मैत्री नेहमी बरोबरीच्या व्यक्तीशी करा, वरचढ असणाऱ्यांशी नाही! - आचार्य चाणक्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 14:53 IST

मैत्रीचे नाते डोळसपणे निवडले पाहिजे अन्यथा आपले अधःपतन होऊ शकते, सांगताहेत आचार्य चाणक्य

रक्ताची नाती आपण निवडू शकत नाही पण मैत्रीतून जुळणारी नाती आपण निवडू शकतो. आपल्याला संगत कोणाची असते यावरून आपले चारित्र्य घडत जाते. यासाठी आचार्य चाणक्य यांनी चाणक्य नीती मध्ये काही सूचना केल्या आहेत. चाणक्य नीतीचे वैशिष्ट्य असे, की आयुष्यातील आर्थिक, राजकीय, सामाजिक अशा सर्व समस्यांची उत्तरे त्यात सापडतात. एवढा दूरदृष्टीने विचार आचार्यांनी केलेला आहे. त्यांच्या अभ्यासपूर्ण वक्तव्याचा आपण उपयोग करून घेऊया. ते सांगतात, 

समाने शोभते प्रीती राज्ञि सेवा च शोभते।वाणिज्यं व्यवहारेषु स्त्री दिव्या शोभते गृहे ॥

मैत्री नेहमी आपल्या बरोबरीच्या व्यक्तींशी केली, तरच भविष्यात वाद विवादाचे प्रसंग टाळता येतात. अशी मैत्री लोकांसाठी देखील आदर्श ठरते. राजेशाही लोकांच्या हाताखाली सेवकवर्ग शोभून दिसतो. व्यवहारात वाकचातुर्य शोभून दिसते आणि सुसंस्कृत घरात शालीन, कुलीन, दिव्य स्त्री शोभून दिसते. 

याचाच अर्थ, आपल्या  वैयक्तिक, सामाजिक, आर्थिक बाबतीत म्हणजे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या प्रगतीला अनुकूल असतील अशीच माणसे जोडावीत. त्यांच्यावर आपली प्रगती अवलंबून असते. आपल्यापेक्षा वरचढ लोक आपल्याला मागे सारतात, तर आपल्यापेक्षा कमी गुणवत्ता असलेले लोक आपला पाय खेचतात. म्हणून आपल्या बरोबरीची व्यक्ती आपल्याला पुढे नेण्यासाठी किंवा निरोगी स्पर्धेसाठी उत्तम ठरते. 

चाणक्य यांनी सांगितलेली सूचना लक्षात ठेवली, तर आपल्यावर पश्चात्तापाची वेळ येणार नाही. आपल्या पूर्वजांनीदेखील 'सुसंगती सदा घडो' असेच श्लोकातून म्हटले आहे. संतांनी तर सत्संग घडावा असे म्हटले आहे. आपणही माणसांची पारख करायला शिकूया आणि स्वतःचा व दुसऱ्याचा विकास घडवूया.