शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
5
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
6
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
7
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
8
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
9
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
10
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
11
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
12
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
13
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
14
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
15
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
16
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
17
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
18
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
19
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
20
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साडे तीन मुहूर्तांमध्ये का मोजला जातो ते वाचा; जाणून घ्या यंदाचा शुभ मुहूर्त!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 13:59 IST

Akshaya Tritiya 2023: क्षय न होता जी तिथी वृद्धिंगत होत राहते ती अक्षय्य तिथी आणि त्या मुहूर्तावर केलेल्या गोष्टींनाही यश प्राप्त होते. सविस्तर वाचा

अक्षय्य तृतीया हिंदू धर्मात अत्यंत शुभ मानली जाते. या दिवशी शुभ कार्ये केली जातात. हिंदू दिनदर्शिकेनुसार अक्षय्य तृतीया दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला येते. यावेळी २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय्य तृतीया येत आहे. त्याची शुभ वेळ, महत्त्व आणि उत्सव साजरा करण्यामागचे कारण जाणून घेऊया. 

अक्षय्य तृतीयेचे महत्त्व

अक्षय्य तृतीयेचा दिवस साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. या दिवशी कपडे, सोन्या-चांदीचे दागिने, वाहन, घर, मालमत्ता इत्यादी खरेदी करणे शुभ मानले जाते. असे मानले जाते की या दिवशी धार्मिक कार्यासोबत दान केल्याने शुभ फळ मिळते. तसेच संपत्तीत वाढ होते.

अक्षय्य तृतीया साजरी करण्याची कारणे

>> पहिल्या पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी भगवान विष्णूंचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्म झाला. म्हणूनच हा दिवस अक्षय्य तृतीया म्हणून साजरा केला जातो. यासोबतच या दिवशी परशुरामाची जयंती म्हणूनही साजरा केला जातो. 

>> दुसर्‍या मान्यतेनुसार, या दिवशी भगीरथच्या कठोर तपश्चर्येने प्रसन्न होऊन गंगा देवी स्वर्गातून पृथ्वीवर अवतरली.

>> तिसऱ्या मान्यतेनुसार माता अन्नपूर्णाचाही जन्म याच दिवशी झाला होता. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी स्वयंपाकघर आणि अन्नधान्याची पूजा करण्यासोबतच भुकेल्यांना अन्नदान करावे, असे सांगितले जाते. 

>> अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान शंकरांना महालक्ष्मीची पूजा करण्यासाठी कुबेराची पूजा करण्यास सांगितले होते. या कारणास्तव अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीची पूजा केल्यास शुभ फळ मिळते.

>> महर्षी वेद व्यास यांनी अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर महाभारताचे लेखन सुरू केले. या ग्रंथात श्री भगवद्गीतादेखील समाविष्ट आहे. असे मानले जाते की या दिवशी  गीतेच्या १८ व्या अध्यायाचे पठण केले पाहिजे.

>> नर-नारायण देखील अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अवतरले असे मानले जाते. म्हणूनच ते शुभ मानले जाते.

>> महाभारतानुसार, या दिवशी भगवान श्रीकृष्णाने पांडवांना त्यांच्या वनवासात 'अक्षय्य पात्र' दिले होते. अक्षय्य पात्र कधीच रिकामे नसते. ते नेहमी अन्नाने भरलेले असते, ज्यातून पांडवांना अन्न मिळत असे. 

>> अशी अक्षय्य संपन्नता आपल्याही आयुष्यात यावी आणि आपल्याला अपेक्षित असलेला आनंद अक्षय्यपणे टिकून राहावा यासाठी अक्षय्य तृतीया लक्ष्मी पूजा करून साजरी केली जाते. 

अक्षय्य तृतीया शुभ मुहूर्त

तृतीया तिथी सुरू होते - २२ एप्रिल रोजी सकाळी ७. ५० वाजता सुरू होते

रोहिणी नक्षत्र - २२ एप्रिल रोजी रात्री २३. २४ मिनिटांनी सुरु होऊन २३ एप्रिल रोजी रात्री १२ वाजून २६ मिनिटांपर्यंत असेल. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीया