शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

Akshaya Tritiya 2023:अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहूर्तावर झाला होता त्रेतायुगाचा प्रारंभ; वाचा प्राचीन ग्रंथाचा संदर्भ!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 07:00 IST

Akshaya Tritiya 2023: अक्षय्य पुण्य देणारे अक्षय्य तृतीयेचे व्रत केव्हापासून सुरु झाले हे जाणून घेणेही तेवढेच महत्त्वाचे आहे, नाही का? 

वैशाख शुक्ल तृतीयेला 'अक्षय्यतृतीया' असे म्हणतात. यंदा २२ एप्रिल २०२३ रोजी अक्षय्य तृतीया आहे. हा दिवस सर्व कार्यासाठी शुभ आणि पुण्यप्रद मानला जातो. या दिवशी केलेले दान अक्षय्य फल देणारे असते. अशी श्रद्धा पुरातन काळापासून आहे. अक्षय्यतृतीया हा काहींच्या मते कृतयुगाचा प्रारंभ दिन आहे. तर काहींच्या मते तो त्रेतायुगाचा प्रारंभ दिन आहे. यासंबंधी असा मतभेद असला तरीही आपण त्रेतायुगाचा प्रारंभ दिन या तिथीला झाला असे मानतो. या संदर्भात अनेक कथा प्राचीन ग्रांथांमधून आढळतात. त्यातील प्रमुख दोन कथा पुढीलप्रमाणे आहेत-

देवधर्म मानणारा आणि धर्माचरणाने वागणारा एक व्यापारी होता. व्यापारातील चढ-उतारात त्याला आर्थिक फटका बसला आणि दारिद्र्य आले. वैशाख शुक्ल तृतीया बुधवारी आली असेल आणि त्यातही रोहिणीनक्षत्रयुक्त असेल तर तो दिवस परमपावन असतो, हे त्याला माहित होते. त्याप्रमाणे योग असलेली अक्षय्यतृतीया आल्यावर या व्रताचे सर्व विधी श्रद्धापूर्वक केले. त्यामुळे पुढल्या जन्मी तो कुशावर्ती नगरीचा राजा झाला. त्याने स्वत: आणि त्याच्या प्रजेने अनेक तऱ्हेचे सुखोपभोग भोगले, तरीही त्याचे पुण्य अक्षय्य राहिले. ती त्रेतायुगाची सुरुवात मानली जाते. 

दुसरी कथा अशी-

धर्मराजाने अश्वमेध यज्ञ पूर्ण केला त्यावेळी यज्ञसमाप्तीच्या वेळी एक मुंगूस यज्ञमंडपात आले. त्याच्या शरीराचा अर्धा भाग सोन्याचा होता. यज्ञमंडपातील वेदीवर ते मुंगूस लोळू लागले. आपले उरलेले अर्धे अंग यज्ञाच्या पवित्र स्थळामुळे सोन्याचे होईल असा त्याचा समज होता. पण तसे झाले नाही. धर्मराजाने `तू असे का लोळतो आहेस?' याची चौकशी केली, तेव्हा मुंगूस म्हणाले, `धर्मराजा, अक्षय्यतृतीयेच्या दिवशी दान केलेल्या गव्हाच्या दाण्याइतकेही पुण्य हा यज्ञ केल्याने तुला लाभलेले नाही. माझे अर्धे शरीर जे सोन्याचे झाले, ते एका सत्यवादी ब्राह्मणाने केलेल्या पुण्यामुळे झाले.' 

धर्मराजाने कुतूहलाने त्याला 'ब्राह्मणाने कोणते पुण्य केले?' असे विचारल्यावर मुंगूस म्हणाले, `तो ब्राह्मण व्यवसाय उद्योग करून जेमतेम आपला चरितार्थ चालवत असे. एका अक्षय्यतृतीयेच्या दिवशी माध्यान्ही तो जेवायला बसणार इतक्यात प्रत्यक्ष भगवंत ब्राह्मणरूपाने त्याच्याकडे येऊन माधुकरी मागू लागला. घरात जे अन्न शिजवले होते ते सर्व अन्न त्या ब्राह्मणाने अतिथीरूपी भगवंताला मोठ्या प्रेमाने दिले. परिणामी त्या ब्राह्मणासह त्याच्या घरातील सगळेजण उपाशी राहिले. अतिथीरूपी देवाने जे अन्न भक्षण केले त्याची थोडीशी शिते, थोडासा अंश जमिनीवर सांडला होता, तो मी खाल्ला. त्यामुळे माझे शरीर अर्धे सोन्याचे झाले. दुसरा अर्धा भागही सोन्याचा व्हावा म्हणून मी इथे आलो, या यज्ञवेदीवर लोळण घेतली. पण माझ्या शरीराचा एक केसही सोन्याचा झाला नाही. म्हणून म्हणतो, या केलेल्या यज्ञापासून तुला थोडेदेखील पुण्य प्राप्त झालेले नाही.' अक्षय्यतृतीयेच्या व्रताचा महिमा असा अलौकिक आहे. 

टॅग्स :Akshaya Tritiyaअक्षय्य तृतीया