शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्मिक : मननशक्तीची किमया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 05:30 IST

- नीता ब्रह्मकुमारी  मानवी मनाचा व त्यात असलेल्या अद्भुत शक्तींचा शोध लावण्याचा प्रयत्न विज्ञानाने केला आहे. आज या मनाची ...

- नीता ब्रह्मकुमारी मानवी मनाचा व त्यात असलेल्या अद्भुत शक्तींचा शोध लावण्याचा प्रयत्न विज्ञानाने केला आहे. आज या मनाची गती खूप तीव्र झालेली आपण पाहातो. म्हणूनच मनोरुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एका मिनिटांत २५ ते ३0 हजार तर पूर्ण दिवसात ४० ते ६० हजार विचार मनात येतात. जर याच गतीने विचार चालत राहिले तर हे मन आणखी कमजोर होऊन जाईल. म्हणून मनाची शक्ती वाढवण्यासाठी मननशक्तीचा उपयोग करणे आवश्यक आहे.शालेय जीवनात एखादे उत्तर लक्षात राहण्यासाठी पाठांतर करावे लागायचे. वारंवार त्याच ओळी मनात बोलत राहण्याचा अभ्यास केला जायचा. त्या अभ्यासाने चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालो. पण जीवनात सफल व्हायचे असेल तर मननशक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे. मनन अर्थात एखाद्या बाबीवर केलेले चिंतन. हे चिंतन चांगले किंवा वाईट दोन्ही प्रकारचे असूशकते.चिंतनाची दिशा जर सकारात्मक असेल तर मन शक्तिशाली होईल. पण तेच नकारात्मक असेल तर मन कमकुवत बनेल. कारण विचारांचा प्रवाह कोणत्या दिशेने वाहतो हे पाहाणे आवश्यक आहे.आज एखादा श्रेष्ठ विचार मनात आला, पण त्याला कर्मामध्ये आणण्याची शक्ती सर्वांमध्ये नसते. काहींचे विचार मनातच समाप्त होतात. एखादी व्यक्ती खूप गरीब असेल, तर तिच्यासाठी मोटारगाडी, बंगला या गोष्टी स्वप्नं असतात. पण एखाद्याने वारंवार ते प्राप्त करण्यासाठी विचार केला व स्वत:ला जाणीव करून दिली की मी हे सर्व काही मिळवू शकतो, तर नक्कीच या मनन करण्याने त्यांच्यामध्ये ती क्षमता येऊ शकते आणि तो जे हवे ते प्राप्त करू शकतो.मोबाइल एक महत्त्वाचे साधन आहे. पण तो रोज कित्येकदा चार्ज करावा लागतो. त्याचप्रमाणे एखाद्या महत्त्वाच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचायचे असेल तर त्याचे मनन करून मनाची शक्ती वाढवण्याची आवश्यकता आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक