शहरं
Join us  
Trending Stories
1
'निवृत्त व्हा, कुठेही जा...तुम्हाला सोडणार नाही', राहुल गांधींचा थेट इशारा; कुणावर संतापले?
2
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर, ९ सप्टेंबरला होणार मतदान, निवडणूक आयोगाची घोषणा, असा आहे संपूर्ण कार्यक्रम
3
ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान भारताचा मोठा निर्णय; अमेरिकेकडून 'एफ ३५' जेट खरेदी करणार नाही!
4
"मोहन भागवत यांना पकडण्याचे आदेश होते"; मालेगाव स्फोट प्रकरणी माजी ATS अधिकाऱ्याचा दावा
5
पंचायत निवडणुकीत उतरले सोशल मीडिया इन्फ्लुएंसर; लाखो फॉलोअर्स पण पडलेली मते एकदा पाहाच
6
जागतिक अस्थिरता असतानाही सोने-चांदी स्वस्त! गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी? भविष्यात काय होणार?
7
PNB Housing Finance ला मोठा झटका, वरिष्ठांच्या राजीनाम्यानंतर शेअर १६% नं आपटला; लागलं लोअर सर्किट
8
चोर तर चोर वर शिरजोर! दागिन्यांच्या दुकानातून अंगठी चोरली, पोलिसांनी पकडल्यावर गुंडगिरी
9
सॅमसंगचे स्मार्ट टीव्ही बंद पडले, ग्राहक ठणाठणा ओरडू लागले; सर्व्हर डाऊनचे मेसेज दिसू लागले...
10
Pune Crime: कोयता काढला अन् सपासप वार करत सुटला; बारामती-इंदापूर धावत्या बसमध्ये प्रवाशावर हल्ला
11
Video: अश्विनी भावेंच्या अमेरिकेतील घरी अवतरली मराठी सिनेसृष्टी, अभिनेत्रीचा आनंद गगनात मावेना
12
बँकेत नोकरीची सुवर्णसंधी; IPBS ची १०,२७७ पदांवर मेगाभरती, महाराष्ट्रासाठी किती जागा?
13
आता PF काढणं झालं एकदम सोपं! फक्त 'हे' काम करा आणि कागदपत्रांशिवाय काही दिवसांत पैसे मिळवा!
14
ऑगस्ट २०२५ पासून बँकिंग आणि पैशांशी निगडीत नियमांत बदल; तुमच्यासाठी जाणून घेणं अतिशय महत्त्वाचं
15
पत्नीने पतीला नपुंसक म्हणणं गुन्हा आहे?; मुंबई हायकोर्टानं दिला महत्त्वाचा निर्णय
16
मुंबई आणि मालेगाव बॉम्बस्फोटात दुटप्पी राजकारण; केशव उपाध्ये यांचा काँग्रेसवर हल्लाबोल
17
अमेरिका एवढ्या खालच्या पातळीवर जाईल असे...; केव्हा केव्हा भारताविरोधात कारस्थाने रचलेली...
18
"मला कोंडून ठेवलं, पत्नीला दुखापत..."; आमदार चेतन आनंद यांचे एम्स कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप
19
जावई पहिल्यांदा सासरवाडीत आला, सासुने मस्त चिकनचा बेत आखला; विषबाधेमुळे दोघांचाही मृत्यू

अधिक मास: ‘असे’ करा पुरुषोत्तम एकादशी व्रत; पाहा, पूजाविधी, मुहूर्त, महत्त्व अन् मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 09:09 IST

Adhik Maas Purushottam Ekadashi 2023: अधिक मासातील एकादशीचे व्रत केल्यास महालक्ष्मीची विशेष कृपा प्राप्त होते, असे म्हटले जाते. यंदा श्रावण अधिक आल्याने २६ एकादशी व्रताचरणाचे पुण्य मिळणार आहे.

Adhik Maas Purushottam Ekadashi 2023: मराठी वर्षातील चातुर्मास काळ सुरू आहे. सन २०२० नंतर सन २०२३ मध्ये तीन वर्षांनी अधिक मास आला आहे. यंदा श्रावण मास अधिक आला आहे. कोणताही अधिक महिना हा प्रथम धरला जातो आणि त्यानंतर निज म्हणजे नियमित महिना धरला जातो. भारतीय संस्कृती, परंपरा, व्रत-वैकल्ये, सण-उत्सव यांमध्ये एकादशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. श्रावण अधिक आल्यामुळे यंदा २६ एकादशी व्रताचरणाचे पुण्य मिळणार आहे. दुसरे म्हणजे अधिक महिन्याची एकादशी ही दुग्ध-शर्करा योगाची मानली गेली आहे. कारण एकादशी आणि अधिक महिना दोन्ही श्रीविष्णूंना समर्पित असतात. पुरुषोत्तम महिन्यातील एकादशीला केलेले व्रताचरण हे विशेष शुभ पुण्यफलदायी मानले गेले आहे. पुरुषोत्तम एकादशीचा मुहूर्त, पूजनविधी, महत्त्व, मान्यता यांविषयी जाणून घेऊया... (Adhik Maas Purushottam Kamala Ekadashi 2023 Date And Time)

अधिक महिन्यातील एकादशीचे व्रत केल्यास महालक्ष्मीचे विशेष शुभाशिर्वाद प्राप्त होतात, असे म्हटले जाते. प्रत्येक मराठी महिन्याच्या शुद्ध पक्षात आणि वद्य पक्षात एकादशी येते. या प्रत्येक एकादशीचे महत्त्व आणि मान्यता अगदी वेगवेगळ्या आहेत. तसेच या प्रत्येक एकादशीची नावेही अगदी वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या एकादशींच्या नावावरून त्याचे वेगळेपण आणि महत्त्व विषद होत असते. पुरुषोत्तम महिन्यात येणाऱ्या दोन्ही एकादशी या कमला एकादशी या नावाने ओळखल्या जातात. नियमित वर्षांमध्ये २४ एकादशी येतात. मात्र, यंदा अधिक महिना आल्यामुळे वर्षभरात येणाऱ्या एकादशीची संख्या २६ झाली असून, या पुरुषोत्तम एकादशीचे व्रताचरण, पूजन अतिशय शुभ व लाभदायक मानले गेले आहे. (Adhik Maas Purushottam Kamala Ekadashi 2023 Shubh Muhurat)

अधिक महिन्यातील कमला एकादशी: शनिवार, २९ जुलै २०२३

कमला एकादशी प्रारंभ: शुक्रवार, २८ जुलै २०२३ रोजी दुपारी ०२ वाजून ५० मिनिटे.

कमला एकादशी सांगता: शनिवार, २९ जुलै २०२३ रोजी दुपारी ०३ वाजून ०५ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्याने पुरुषोत्तम मासातील कमला एकादशी व्रताचे आचरण शनिवार, २९ जुलै २०२३ रोजी करावे, असे सांगितले जाते.

​पुरुषोत्तम कमला एकादशीचे व्रतपूजन

पुरुषोत्तम एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी पहाटे नित्यकर्म आटोपल्यानंतर कमला एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. यावेळी पिवळ्या रंगाच्या वस्त्राचा आवर्जुन वापर करावा. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. नैवेद्यामध्ये पिवळ्या रंगाची मिठाई, खीर यांचा समावेश असल्यास उत्तम. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू चालीसा, विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे. (Adhik Maas Purushottam Kamala Ekadashi 2023 Vrat Puja Vidhi)

कमला एकादशीचे व्रतपूजनाची सांगता

पुरुषोत्तम कमला एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना मनात कोणत्याही प्रकारचा संशय ठेऊ नये. व्रतदिनी केवळ फलाहार घ्यावा. ज्यांना केवळ फलाहार करणे शक्य नाही, त्यांनी सात्विक आहार घ्यावा. शक्यतो कांदा, लसूणयुक्त उग्र पदार्थ खाणे टाळावे. एकादशी दिनी केलेल्या व्रतानंतर दुसऱ्या दिवशी उठून स्नानदिक कार्ये आटोपल्यानंतर की, एकादशी व्रत सांगतेचा संकल्प करून तो पूर्ण करावा. यावेळी श्रीविष्णूंची मनोभावे पूजा करावी. व्रताच्या यशस्वीतेसाठी श्रीविष्णूंचे आभार मानावेत. व्रत आचरण काळात कोणाबाबतही अपशब्द बोलू नयेत. पूजा करताना कोणाच्याही बाबतीत मनात ईर्ष्या उत्पन्न करू नये. तसेच व्रताचरण करताना अनावधानाने झालेल्या चुकांबाबत श्रीविष्णूंकडे क्षमायाचना करावी. (Adhik Maas Purushottam Kamala Ekadashi 2023 Significance)

​पुरुषोत्तम कमला एकादशीचे महत्त्व

वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. पुरुषोत्तम महिन्यातील कमला एकादशी दिनी केलेल्या व्रतपूजनाचे विशेष पुण्य प्राप्त होऊन सर्व मोक्ष मिळू शकतो, अशी मान्यता आहे. अधिक महिना श्रीविष्णूंचा प्रिय महिना असल्याचे सांगितले जाते. पुरुषोत्तम एकादशीचे व्रत आचरणाऱ्यांना स्वर्ण दान आणि हजार यज्ञाचे पुण्य प्राप्त होते, अशी मान्यता आहे. तसेच पुरुषोत्तम एकादशीचे यशस्वी व्रताचरणामुळे मोक्षप्राप्ती होते. मनोकामना, प्रबळ इच्छा पूर्ण होतात. श्रीविष्णूंची कृपा आणि शुभाशिर्वाद प्राप्त होतात. श्रीविष्णूंसह महालक्ष्मी देवीची कृपादृष्टीही राहते. त्यामुळे श्रीविष्णूंना प्रसन्न करण्यासाठी पुरुषोत्तम एकादशीचे व्रत आवर्जुन आचरावे. पुरुषोत्तम महिना तीन वर्षातून एकदा येत असल्यामुळे अशी सुवर्ण संधी पुन्हा पुन्हा उपलब्ध होत नाही. त्यामुळे पुण्यप्राप्तीचे लाभ मिळण्यासाठी पुरुषोत्तम एकादशी व्रत करावे, असे सांगितले जाते. 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाReligious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिक