शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

अधिक मास: ‘या’ गोष्टींचे आवर्जुन दान करा, दुपटीने पुण्य कमवा; कोणत्या दिवशी काय द्यावे? वाचा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2023 16:02 IST

Adhik Maas 2023 Donation Daan: भारतीय संस्कृतीत दानाला अतिशय महत्त्व आहे. अधिक मासातील दान विशेष मानले जाते. सविस्तर जाणून घ्या...

Adhik Maas 2023 Donation Daan: सन २०२० नंतर आता सन २०२३ मध्ये आलेल्या अधिक मासात अनेकविध शुभ योग जुळून येत असल्याचे सांगितले जात आहे. २०२३ मध्ये श्रावण महिना अधिक आला आहे. १८ जुलैपासून सुरू झालेला अधिक श्रावण महिना १६ ऑगस्टपर्यंत राहणार आहे. त्यानंतर निज श्रावण सुरू होईल. मराठी महिन्यातील श्रावण महिना अधिक आल्यामुळे यंदाचा चातुर्मासाचा काळ हा पाच महिन्यांचा झाला आहे. अधिक महिना शुभ-फलदायी मानला जातो. भारतीय परंपरा, संस्कृती यांमध्ये दानाचे महत्त्व वेगळे आणि विशेष आहे. अधिक महिन्यातही यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते. कोणत्या दिवशी काय दान करावे? जाणून घ्या...

अधिक महिना व्रत-वैकल्ये, उपास, दान, पूजा, यज्ञ, हवन आणि ध्यानधारणा करण्यासाठी सर्वोत्तम मानला गेला आहे. या कालावधीत केलेल्या आराधना, उपासना, नामस्मरण, जप यांमुळे पापकर्मांचा क्षय होऊन पुण्यप्राप्ती होऊ शकते, असे सांगितले जाते. या कालावधीत दान केलेला एका रुपायाचे पुण्यफळ दसपटीने मिळते, अशी मान्यता आहे. तसेच पुरुषोत्तम महिन्यात श्रीकृष्ण कथा, श्री भागवत कथा, श्रीराम कथा, विष्णू सहस्रनाम, पुरुषसुक्त, श्री सुक्त, हरिवंश पुराण, गुरुने दिलेल्या प्रदत्त मंत्राचा नियमित जप, तीर्थस्थळी जाऊन स्नान आदी कार्ये केल्याने अधिक पुण्य प्राप्त होते, असे सांगितले जाते.

अधिक महिना आणि दानाचे महत्त्व 

भारतीय संस्कृती, परंपरा, संस्कार यांमध्ये दानाला अधिक महत्त्व असल्याचे सांगितले जाते. अगदी रामायण, महाभारत काळापासून दानाचे महत्त्व अधोरेखित झालेले दिसते. कर्ण हा आपल्या दानशूरपणासाठी आजही ओळखला जातो. कोणतेही धार्मिक कार्य असले की, यथाशक्ती दान करावे, असे सांगितले जाते. तहानलेल्या व्यक्तीला पाणी देणे, भुकेल्या व्यक्तीला अन्न देणे, असे संस्कार आपल्याकडे प्राचीन काळापासून सुरू असल्याचे दिसतात. दीपदान, वस्त्र तसेच भागवत कथा ग्रथांचे दान अधिक महिन्यात अधिक पुण्य फलदायी मानले गेले आहे. असे केल्याने धन, वैभव, धान्य वृद्धिंगत होते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अधिक महिन्यातही दानधर्म करण्याविषयी काही पुराणात, शास्त्रांमध्ये उल्लेख आल्याचे दिसते. इतकेच नव्हे, तर अधिक महिन्यातील कोणत्या तिथीला काय दान करावे, याचे नियमही घालून दिल्याचे दिसून येते.

अधिक महिन्यातील तिथीनुसार दान-धर्म 

- प्रतिपदा : तुप, चांदी यांचे दान करावे- द्वितीया : सोने, कांस्य यांचे दान करावे- तृतीय : चणे वा चण्याची डाळ यांचे दान करावे- चतुर्थी : खारीक दान करावी.- पंचमी : गुळ दान करावा.- षष्ठी : अष्टगंध दान करावे.- सप्तमी : रक्त चंदन, गोड पदार्थ, रंग यांचे दान करावे.- अष्टमी : रक्त चंदन, कापूर, केवडा यांचे दान करावे.- नवमी : केशर दान करावे.- दशमी : कस्तुरी दान करावे.- एकादशी : गोरोचन दान करावे.- द्वादशी : शंख दान करावा.- त्रयोदशी : घंटी, घंटा दान करावे.- चतुर्दशी : मोती, मोत्याची माळ दान करावी.- पौर्णिमा/अमावास्य : माणिक तसेच अन्य रत्ने दान करावी.

 

टॅग्स :Adhik Maasअधिक महिनाspiritualअध्यात्मिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम