शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जास्वंदीत घाला 'हे' घरगुती खत; येत्या संकष्टीपर्यंत बाप्पासाठी मिळतील परडीभर फुलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 11:41 IST

दिवाळीच्या आधी जास्वंदीच्या रोपाची चांगली काळजी घेतली, तर हिवाळा सुरुहोईपर्यंत रोपटं फुलांनी भरून जाईल; त्यासाठी वापरा 'या' घरगुती टिप्स!

दर मंगळवारी किंवा विनायकी अथवा संकष्टीला बाप्पाला जास्वंदीचे फुल आणि दुर्वा वाहाव्यात असे आपल्याला वाटते. घराच्या आवारात, बाग बगिच्यात दुर्वा सहज मिळू शकतात, मात्र एक जास्वंद विकत घ्यायला जावे तर २०-२५ रुपये भाव सांगतात. त्यांच्या चरितार्थाला हातभार म्हणून विकत घेण्यास हरकत नाही, पण कधी जर घरच्या घरी बाप्पासाठी जास्वंदीच्या फुलांचा हार बनवावा वाटला तर त्यासाठी तुमच्या खिडकीत, पडवीत, दारात, अंगणात लावलेल्या जास्वंदीच्या रोपाला घरगुती खाद्य अवश्य घाला. 

जास्वंदीच्या रोपाची योग्य काळजी न घेतल्यास कीटकांचा प्रादुर्भाव होतो आणि झाडातील फुलेही उमलणे बंद होते. तुमच्या जास्वंदीच्या रोपामध्ये अशी कोणतीही समस्या दिसल्यास किंवा ती पूर्णपणे कोमेजलेली दिसत असल्यास, तुम्हाला वेळोवेळी त्यात खत घालावे लागेल. 

बागेत फुलझाडे लावणे प्रत्येकाला आवडते, परंतु त्याची योग्य काळजी घेणे देखील आवश्यक आहे. आता हिवाळा ऋतू येत आहे. या काळात बागेत फुललेली जास्वंदीची फुले पाहणे खूप आनंददायी असते. हा आनंद घरच्या घरी घ्यायचा असेल तर कोणते घरगुती खत करून वापरायचे ते जाणून घेऊ. जेणेकरून तुमच्या जास्वंदीच्या रोपालाही शेकडो फुले येऊ शकतील... 

जास्वंदीचे रोप निरोगी ठेवण्यासाठी, दिवाळीपूर्वी, तुम्ही कोरडा कांदा आणि केळीच्या सालीपासून खत बनवू शकता आणि ते रोपट्याला घालू शकता.

>> यासाठी सर्वप्रथम एका भांड्यात एक लिटर पाणी घ्या. >> केळ्याचे साल त्यात टाका. >> यामध्ये कांद्याची साले पण टाका.>> हे भांडे २४ तास झाकून ठेवा. >> यानंतर पाण्याचा रंग बदलून तपकिरी होईल तेव्हा ते गाळून पाणी वेगळे करा.>> आता तयार झालेले द्रव खत आपण जास्वंदीच्या रोपाला घालू शकता.>> हे द्रव खत घालण्यापूर्वी, माती हलकीशी मोकळी करा, उपसून घ्या. >> यानंतर एक चमचा चहा पावडर मातीत मिसळा.>> पाच मिनिटांनंतर, तयार केलेले घरगुती द्रव खत घाला.>> अशा प्रकारे तुम्ही हे द्रव खत दर १५ दिवसांनी घालू शकता.

दिवाळीच्या आधी हे खत घालायला सुरुवात केली, तर हिवाळा येईपर्यंत तुमचे जास्वंदीचे रोप फुलांनी भरून जाईल आणि येत्या संकष्टीला घरी उमललेल्या जास्वंदाच्या फुलांचा भरगच्च हार बाप्पाला वाहता येईल!

टॅग्स :Gardening Tipsबागकाम टिप्सSankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी