शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
3
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
4
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...
5
Share Market Update: सेन्सेक्स २५७ आणि निफ्टी ९९ अंकांच्या तेजीसह सुरुवात; तेजीसह उघडले हे स्टॉक्स?
6
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
7
आई-वडील अन् पती कामावर गेले, मैत्रिणींना घरी बोलावून महिलेने कांड केले! कारनामे समोर येताच... 
8
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
9
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
10
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
11
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
12
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
13
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
14
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
15
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
16
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
17
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
18
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
19
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
20
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार

तरूण तडफडून मेला, पण सर्जन आलेच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:33 IST

बीड : रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारलेल्या तरुणाला अपघात विभागात दाखल केले. तत्काळ सर्जनला कॉल दिला; परंतु ते आलेच नाहीत. ...

बीड : रुग्णालयाच्या इमारतीवरून उडी मारलेल्या तरुणाला अपघात विभागात दाखल केले. तत्काळ सर्जनला कॉल दिला; परंतु ते आलेच नाहीत. अखेर ८ तासांनंतर जखमी तरुणाचा तडफडून मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. या प्रकाराने अधिकाऱ्यांचे ढिसाळ नियोजन आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

अबोध भोसले (वय ३१, रा. सावरगाव, ता. भूम, जि. उस्मानाबाद) असे मृताचे नाव आहे. अबोधचे शिक्षण डी.एड्‌. झालेले आहे. तो सध्याा पुण्याजवळील एका गावात राहत होता. काही दिवसांपूर्वीच त्याने तणावामुळे गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्यात सुदैवाने तो बचावला आणि त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे उपचार सुरू होते. परंतु परिस्थिती गरीब असल्याने त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी दाखल केले. त्याच्यावर स्थलांतरीत रुग्णालयातील वाॅर्ड क्रमांक ६ मध्ये उपचार सुरू होते. रविवारी मध्यरात्री १२ वाजेच्या सुमारास अबोधने वरच्या मजल्यावरून खाली उडी मारली. त्यात त्याला पाठीला थोडी जखम झाली होती, परंतु आतमध्ये जास्त जखम असल्याचे सांगण्यात आले. त्याला तत्काळ अपघात विभागात दाखल केले. येथे वैद्यकीय अधिकारी डॉ. शंकर काशीद यांनी त्याच्यावर तत्काळ उपचार सुरू केले. त्यानंतर सर्जन, मानसोपचारतज्ज्ञ यांना कॉल देण्यात आला. मानसोपचारतज्ज्ञांनी येऊन तपासणी करत औषधी दिले. परंतु अबोधला शरीरात आतून जखम असल्याने सर्जनची गरज होती. सकाळी ९ वाजेच्या सुमारास अबोधने शेवटचा श्वास घेतला. अबोध तडफडून मेला परंतु सर्जन रुग्णालयात फिरकलेच नसल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळेच अबोधचा जीव गेल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. याबाबत पोलीस चौकीत अबोधचा भाऊ आमोल यांनी जबाब दिला आहे.

फिजिशियनही फिरकेनात

जिल्हा रुग्णालयात कोविड वॉर्डमध्ये चार तर स्थलांतरीत जिल्हा रुग्णालयात ३ असे सात फिजिशियन आहेत. असे असतानाही स्थलांतरित रुग्णालयात कॉलवर या फिजिशियनला न ठेवता इतर डॉक्टरांच्या ड्युट्या लावल्या जातात. हे फिजिशियन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मर्जीतील असल्याने इकडे कधीच फिरकत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. एसीएस डॉ. राठोड यांनी इतर डॉक्टरांना ड्युटी लावल्याचेही मान्य केले.

सीएस, एसीएस विरोधात सामान्यांमध्ये रोष

मागील काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयातील कारभार ढेपाळला आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सूर्यकांत गित्ते, एसीएस डॉ. सुखदेव राठोड हे केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. कसलेही नियोजन नसल्याने सामान्य रुग्णांचे हाल होत आहेत शिवाय अबोधसारख्यांचा रोज जीव जात आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांविरोधात सामान्यांमध्ये तीव्र रोष आहे.

कोट

हा तरुण दोन दिवसांपूर्वी दाखल झाला होता. त्याला मानसोपचार तज्ज्ञ, फिजिशियनने उपचार केले होते. रविवारी रात्री हा तरण इमारतीवरून पडला. तो गंभीर जखमी होता. अपघात विभागात डीएमओने तपासले होते. सकाळी ९ वाजता मृत्यू झाला. नातेवाईकांच्या आरोपांचे काय ते बघू.

डॉ. सुखदेव राठोड, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक, बीड

===Photopath===

150321\152_bed_4_15032021_14.jpeg~150321\152_bed_3_15032021_14.jpeg

===Caption===

पोलीस चौकीत जबाब देण्यासाठी आलेला अबोधचा भाऊ आमोल भोसले.~मयत अबोध भोसले