शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

चोरीतील हस्तगत ‘योगेश्वरी’चे २५ तोळे दागिने न्यायमंदिरातूनही चोरीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 00:43 IST

अंबाजोगाई : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची स्ट्राँग रूम फोडून बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा ४ लाख ३२ हजार ९२४ रुपयांचा ऐवज लंपास केला. सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेल्या योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरीतील हस्तगत झालेले २५ तोळे सोनेही चोरट्यांनी पुन्हा चोरले.

लोकमत न्यूज नेटवर्कअंबाजोगाई : येथील जिल्हा व सत्र न्यायालयाची स्ट्राँग रूम फोडून बुधवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व इतर साहित्य असा ४ लाख ३२ हजार ९२४ रुपयांचा ऐवज लंपास केला. सहा वर्षांपूर्वी महाराष्ट्रात गाजलेल्या योगेश्वरी देवीच्या दागिन्यांची चोरीतील हस्तगत झालेले २५ तोळे सोनेही चोरट्यांनी पुन्हा चोरले. देवीच्या त्याच दागिन्यांची दोनदा चोरी झाल्याने खळबळ उडाली आहे. या चोरीच्या तपासासाठी दोन पथके नेमली आहेत. मंदिरात झालेल्या चोरीनंतर आता न्यायमंदिरातही मोठी चोरी झाल्याने सुरक्षिततेच्या प्रश्न ऐरणीवर आला आहे.

अंबाजोगाई जिल्हा व सत्र न्यायालयातील स्ट्राँगरूममध्ये तीन न्यायालयातील मुद्देमाल ठेवलेला होता. बुधवारी रात्री झालेल्या चोरीनंतर गुरुवारी दिवसभर स्ट्राँगरूममध्ये ठेवलेल्या ऐवजाची पडताळणी करण्यात आली. स्ट्राँगरूममध्ये दैनंदिन व्यवहाराच्या रकमा, किमंती मुद्देमाल ठेवला जातो. या मुद्देमालाची तपासणी प्रत्येक महिन्यात १ ते ५ तारखेपर्यंत होते व याची नोंद घेतली जाते.

या नोंदीनुसार दिवाणी न्यायालयाच्या एका पेटीत रोख रक्कम १ हजार ३४४ रुपये होते. यासह चेकबुक, एफ.डी.च्या पावत्या तर दुस-या दोन पेट्यातील सोन्या-चांदीचे दागिने व इतर ऐवज चोरीस गेला आहे.

न्यायमंदिरात झालेल्या या चोरीत ४ लाख २८ हजार ९४० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम १ हजार ३३४ रुपये, २ हजार ५०० रुपयांचा मोबाईल असा ऐवज चोरीस गेला आहे. न्यायालयाचे अधीक्षक नरहरी थोरात यांच्या फिर्यादीवरून अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा नोंद झाला आहे. या चोरीचा लवकर तपास लावणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.

देवीच्या दागिन्यांना ग्रहणमहाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीच्या अंगावरील ३१ तोळे सोने व तीन किलो चांदीच्या दागिन्यांची चोरी १८ एप्रिल २०१२ रोजी झाली होती. या चोरीतील १५ तोळे दागिने हस्तगत करून ते न्यायालयात जमा झाले होते. त्या जमा झालेल्या दागिन्यांचीही पुन्हा चोरी झाली आहे. चोरीच्या प्रकरणातील आरोपींची नऊ महिन्यांपूर्वीच निर्दोष मुक्तता झाली होती. हे प्रकरण अजून शमलेही नाही तोपर्यंत दागिन्यांची पुन्हा झालेली चोरी भाविकांना वेदनादायी ठरणारी आहे.

एलसीबी, दरोडा प्रतिबंधक लागले कामालाअंबाजोगाईच्या न्यायमंदिरात झालेल्या चोरीनंतर या चोरीचा तपास अंबाजोगाईचे पोलिस निरीक्षक सोमनाथ गित्ते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या चोरीच्या तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखा, बीड व दरोडा प्रतिबंधक पथक यांची स्वतंत्र दोन पथके नियूक्त करण्यात आली आहेत.