शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पंचायत राजच्या स्वागताला, झाडू लागला कामाला; शिरूर तालुक्यात समितीचा दौरा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2017 19:14 IST

संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या न्यायाने दसरा - दिवाळीत प्रत्येक घराची अंतर्बाह्य स्वच्छता करुन रंगरंगोटी केली जाते. अगदी त्याच धर्तीवर सध्या तालुक्यात पंचायत राज समिती येणार असल्याने समितीच्या स्वागताला प्रत्येक कार्यालयात झाडू कामाला लागल्याचे चित्र दिसत आहे.

शिरुर कासार (बीड) : संत येती घरा तोचि दिवाळी दसरा या न्यायाने दसरा - दिवाळीत प्रत्येक घराची अंतर्बाह्य स्वच्छता करुन रंगरंगोटी केली जाते. अगदी त्याच धर्तीवर सध्या तालुक्यात पंचायत राज समिती येणार असल्याने समितीच्या स्वागताला प्रत्येक कार्यालयात झाडू कामाला लागल्याचे चित्र दिसत असून, पंचायतराजच्या परिक्षेत जास्तीत जास्त गुणांकन मिळण्यासाठी प्रयत्न होत असून, किमान प्रथम श्रेणीत आलो नाही तरी चालेल पण लालशेरा पडता कामा नये याची गांभीर्याने दखल घेतली जात असल्याचे दिसत आहे.

पंचायत राज समितीत मान्यवरांचा समावेश असतो. त्यांचे अधिकार कक्ष देखील व्यापक स्वरुपाचे असतात याची जाणीव ठेवून कार्यालयात समितीला अपेक्षित असलेले बदल दृष्टिक्षेपात आणण्याचा कसोशिने प्रयत्न केला जात आहे. देशाचा पंतप्रधान जर हातात झाडू घेऊन स्वच्छतेचा संदेश देत असेल तर त्याचा सन्मान म्हणून आता आपण सुद्धा हातात झाडू घेताना कमीपणा वाटून घेऊ नये असे म्हणत कार्यालयीन प्रमुख स्वच्छतेच्या कामात पुढाकार घेताना दिसून येत आहे.

मागील काही दिवसांपूर्वी तहसीलदार बालाजी शेवाळे यांनी तहसील कार्यालयातही स्वच्छता मोहिमेचा हातात झाडू घेऊन प्रारंभ केला. त्यावेळी सर्व कर्मचारी देखील आपापला कक्ष स्वच्छ करीत होते.जिल्हाधिकारी यांनी भेटीत अधिकार्‍यांची केलेली कानउघडणी सर्वत्र चर्चिली गेली. त्यानंतर पंचायत समिती कार्यालयातदेखील पिचकार्‍यांनी रंगलेले कोपरे तर स्वच्छ केलेच परंतु कागदपत्राच्या सालवाईज, विषयानुसार अत्यंत व्यवस्थितपणे ठेवण्यात आल्या. आता तर पंचायत राज समिती येणार म्हटल्यावर गावपातळीवरचे छोटे कार्यालय देखील न जाणो हा दौरा आपल्या भेटीला आलाच तर ! अशी शक्यता नाकारता येत नसल्याने वरच्या स्वच्छतेबरोबर कागदी कारभार सुद्धा देखणा करण्यात सर्वजण गुंतले आहेत.

कचरा बाहेर, तर कागदपत्राच्या फाईलही दिसू लागल्या टकाटकदवाखाने, ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाड्या, बालविकास प्रकल्प कार्यालय, पंचायत समिती, कृषी कार्यालय, पशु वैद्यकीय दवाखाने आदी कार्यालयात सध्या पंचायत राज समिती दौर्‍याची व त्यांच्या स्वागतासाठी सर्वोतोपरी तयारी सुरु असल्याने स्वच्छतेचे वारे चांगलेच सुखावून टाकत आहे.

पंचायतराज समितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या या कामात कायम स्वरुपी सातत्य व नियमितता ठेवल्यास इतकी धावपळ करण्याची गरजच असणार नसल्याचे बोलले जाते. पंचायतराज समितीच्या या दौर्‍यामुळे का होईना सध्या झाडूला चांगले काम लागले आणि कार्यालयाचा चेहरामोहरा टवटवीत दिसू लागला आहे हे ही नसे थोडके.

टॅग्स :Beedबीड