वीजबिल न भरणाऱ्यांवर कारवाई
बीड : तालुक्यातील पालसिंगण येथे अनेक ठिकाणी वीजतारांवर आकडे टाकून विजेची चोरी केली जात आहे. यामुळे वेळोवेळी वीज गुल होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी वीजचोरी करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. त्यामुळे विजेचा लपंडाव बंद होण्यास मदत होणार आहे असे नागरिकांचे म्हणणे आहे.
वीज गायब, ग्राहकांत संताप
बीड : वडवणी तालुक्यातील चिंचोटी, साळिंबा, कुप्पा, देवडी, चिंचाळा, उपळी आदी गावांतील वीजपुरवठा सुरळीत सुरू नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. तासन्तास वीज गायब असते. त्यामुळे ग्राहकांमध्ये तीव्र संताप आहे. महावितरणने यावर योग्य ती कारवाई करून वीजपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
बीड शहरात अवैध प्रवासी वाहतूक
बीड : शहरातील साठे चौक, नगर नाका, बार्शी नाका, मोंढा रोड भागात सध्या खाजगी वाहनांमधून सर्रासपणे अवैध प्रवासी वाहतूक केली जात आहे. याकडे वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसविले जात असल्याने अपघातास निमंत्रण मिळत आहे. यावर योग्य ती कारवाई करण्याची मागणी होत आहे. हे वाहनधारक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहनांत बसवून त्यांच्या जीवितास धोका निर्माण होत आहे.