शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

गेवराईच्या शासकीय रुग्णालयास महिलांचे प्राधान्य; महिनाभरात झाल्या १३९ नैसर्गिक प्रसुती

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 19:32 IST

शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डिसेंबर महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १६० महिलांची प्रसुती  झाली आहे. यातील १३९ महिलांची नैसर्गिक प्रसुती झाली तर २१ सिझेरियन आहेत. नॉर्मल प्रसुतीची वाढती संख्या व विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे रुग्णालयात उपचारासाठी महिलांचे प्राधान्य आहे.

गेवराई : शहरातील उपजिल्हा रुग्णालयात डिसेंबर महिन्यात येथील उपजिल्हा रुग्णालयात एकूण १६० महिलांची प्रसुती  झाली आहे. यातील १३९ महिलांची नैसर्गिक प्रसुती झाली तर २१ सिझेरियन आहेत. नॉर्मल प्रसुतीची वाढती संख्या व विश्वासू वैद्यकीय सेवेमुळे रुग्णालयात उपचारासाठी महिलांचे प्राधान्य आहे.

येथील शासकीय उपजिल्हा रूग्णालयात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली  प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश शिंदे  आणि सहकारी डॉक्टर चांगली उपचारसेवा देत आहेत. येथील वैद्यकीय अधिकारी, महिला कर्मचार्‍यांच्या प्रयत्नांमुळे महिल रुग्णांना व्यवस्थित व योग्य उपचार मिळत असल्याने रुग्ण व  त्यांचे नातेवाईक समाधान व्यक्त करत  आहेत. हर्निया, गर्भाशयाची पिशवी काढणे, बिनटाक्याची कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया व इतर शस्त्रक्रियाही करण्याची सुविधा असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली. 

वैद्यकीय अधिकारी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अजय पंडित, डॉ.गोपाल रांदड, डॉ.एम.ए.रऊफ, डॉ. सराफसह कर्मचार्‍यांच्या परिश्रमामुळे महिलांच्या प्रसूती काळजीपूर्वक होत आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांची टीम येथे सदैव तत्पर असल्याने गरोदर मातांनी शासकीय उपजिल्हा रूग्णालयातच उपचार घ्यावेत, खाजगी रुग्णालयात जाण्याचा खर्च टाळावा, असे आवाहन  प्रशासनाने केले आहे. उपजिल्हा रूग्णालयात महिलांना प्रसुतीनंतर दोन वेळा, जेवण, अल्पोपाहार व चहाची सोय असून  दारिद्र्य रेषेखालील व अनुसूचित जाती-जमातीच्या महिलांना प्रसुतीनंतर ६०० रुपयांचा धनादेश शासनातर्फे देण्यात येतो. सेवेसोबत रुग्णांचा विश्वास संपादित  करीत असल्याचे डॉ. शिंदे म्हणाले. 

एकही बालमृत्यू नाही जिल्ह्यात एकमेव पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया येथील उपजिल्हा रुग्णालयात झाली आहे. जिल्ह्यातील ६ माता मृत्यूपैकी १ गेवराई तालुक्यात झाला आहे. एकही बालमृत्यू झालेला नाही. - डॉ.राजेंद्र शिंदे, प्र. वैद्यकीय अधीक्षक, गेवराई