शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाहीत; पोलीस यंत्रणा कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 19:25 IST

स्त्रियांवरील अत्याचार भाजप महिला आघाडी कदापीही सहन करणार नसून या लाजिरवाण्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा

ठळक मुद्देकिनगाव कोपरा प्रकरणातील सर्व आरोपींना ताबडतोब अटक कराभाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांची मागणी 

अंबाजोगाई : लातूर जिल्ह्यातील कोपरा (जि.लातूर) येथील २६ वर्षीय तरुणीचा गावगुंडांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवकाच्या मदतीने विनयभंग करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात पोलीस आरोपींना पाठीशी घालत असल्याचा प्रकार  संतापजनक आहे. सर्व आरोपींना तत्काळ अटक करून भर चौकात शिक्षा द्यावी अशी मागणी भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे यांनी केली. त्यांनी मंगळवारी (दि.१६) अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात पिडीतेची आणि तिच्या कुटुंबियांची भेट घेतली.

कोपरा (ता. अहमदपूर, जि. लातूर) येथे शुक्रवारी (दि.१२) दुपारी २६ वर्षीय पिडीतेच्या घरासमोर सार्वजनिक बांधकाम करताना माझी आई बाहेर गेली आहे, आल्यानंतर काम करा, असे सांगूनही आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून तरुणीचा विनयभंग करत मारहाण केल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सरपंचासह १७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पिडीत तरुणीवर अंबाजोगाई येथील स्वाराती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मंगळवारी (दि.१६) भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा उमा खापरे, आ. रमेश कराड यांनी रुग्णालयात पिडीतेची भेट घेतली. 

यावेळी खापरे म्हणाल्या की, महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिला नाही. राज्यात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले आहे. घटनेच्या चार दिवसानंतरही फक्त दोघांना अटक करणारे पोलीस आरोपींना पाठीशी घालण्यात धन्यता मानत आहेत. पोलीस यंत्रणा कुचकामी झाली आहे. स्त्रियांवरील अत्याचार भाजप महिला आघाडी कदापीही सहन करणार नसून या लाजिरवाण्या घटनेच्या पार्श्वभूमीवर गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा अशी मागणी खापरे यांनी केली. यावेळी त्यांच्या समवेत ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, भाजप तालुकाध्यक्ष अच्युत गंगणे, हिंदुलाल काकडे यांच्यासह महिला कार्यकर्त्या मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी