शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

मालवाहू रिक्षाच्या धडकेत महिला जागीच ठार, मुलगा गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST

कासारी गावाजवळील कडा कारखान्याजवळ नेकनूरकडून पिंपरी चिंचवडकडे मालवाहू रिक्षा (क्र. एम.एच. १४ एच.जी. ०३८४) जात हाेता. तर आष्टी ...

कासारी गावाजवळील कडा कारखान्याजवळ नेकनूरकडून पिंपरी चिंचवडकडे मालवाहू रिक्षा (क्र. एम.एच. १४ एच.जी. ०३८४) जात हाेता. तर आष्टी येथून आपल्या सराटेवडगावकडे रुक्मिणी संतोष बोडखे (४०) या मुलगा प्रवीण बोडखे (१८) सोबत दुचाकीने जात होत्या. दरम्यान मालवाहू रिक्षाने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिली. यात रुक्मिणी संतोष बोडखे या जागीच ठार झाल्या, तर मुलगा प्रवीण गंभीर जखमी झाला असून आष्टी येथील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

अपघाताची माहिती कळताच सरपंच राम धुमाळ, उपसरपंच नवनाथ जाधव, युवराज धुमाळ यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मयत रुख्मिणी बोडखे यांच्या पार्थिवावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून सराटेवडगाव येथील स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले. पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे. अपघातप्रकरणी राजू मच्छिंद्र बोडखे यांच्या फिर्यादीवरून आष्टी पोलीस ठाण्यात कलम २७९, ३३८, ३०४ अ भादंविनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पो.नि. सलीम चाऊस यांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळी धाव घेत सहायक पोलीस उपनिरीक्षक एन.वाय. धनवडे, पोना. सिरसाठ यांनी पंचनामा करून पुढील तपास पो.काॅ. अनिल सुंबरे करत आहेत.