लोकमत न्यूज नेटवर्कगढी : आजाराला कंटाळून एका महिलेने घरालगत असलेल्या इंग्लिश स्कूलमधील एका खोलीतील फॅनला गळफास घेऊन जीवन संपविले. ही घटना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे घडली. घटनेनंतर बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. तलवाडा ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद आहे.कावेरी राधेश्याम चव्हाण (वय ४१) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. कावेरी यांच्या घराशेजारीच त्यांचे दीर रामेश्वर चव्हाण यांची संजिवनी इंग्लिश स्कूल आहे. त्यांना पोटाचे विकार होते. दोन वेळेस शस्त्रक्रिया केली, मात्र काहीच फरक पडला नाही, त्यामुळे त्या त्रस्त होत्या. दिवसेंदिवस हा आजार वाढत गेल्याने त्या कंटाळल्या होत्या. शुक्रवारी पहाटे त्यांनी घरात अंघोळीला पाणी ठेवले आणि बाजूच्या शाळेत गेल्या. आजूबाजूला कोणी नसल्याची संधी साधून नायलॉनच्या दोरीने एका खोलीतील फॅनला त्यांनी गळफास घेतला.इकडे पाणी उकळले तरी बाहेर गेलेली पत्नी कशी आली नाही, म्हणून पती पाहण्यास गेले असता त्यांना हा प्रकार दिसून आला. याची माहिती तातडीने तलवाडा पोलिसांना दिली. तोपर्यंत गावातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. पोलिसांनी पंचनामा केला. याची आकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. दुपारच्या सुमारास कविताच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुले असा परिवार आहे.
जातेगावात इंग्लिश स्कूलमध्येच महिलेने घेतला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2018 23:49 IST
आजाराला कंटाळून एका महिलेने घरालगत असलेल्या इंग्लिश स्कूलमधील एका खोलीतील फॅनला गळफास घेऊन जीवन संपविले.
जातेगावात इंग्लिश स्कूलमध्येच महिलेने घेतला गळफास
ठळक मुद्देखळबळ : आजाराला कंटाळल्याचे कारण