शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

एक एकर शेतीतून महिलेने कमावले पाच लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:26 IST

पुरुषोत्तम करवा लोकमत न्यूज नेटवर्क माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला अपघातामुळे अपंगत्व आले. सर्व जबाबदारी अंगावर पडली. संकटाला न ...

पुरुषोत्तम करवा

लोकमत न्यूज नेटवर्क

माजलगाव : पाच वर्षांपूर्वी पतीला अपघातामुळे अपंगत्व आले. सर्व जबाबदारी अंगावर पडली. संकटाला न घाबरता कुटुंबाची जबाबदारी पेलली. सध्या या महिलेने आपल्या शेतीत एक एकरात रेशीम शेती केली. यातून दरवर्षी पाच लाखांची कमाई होत आहे.

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे या अल्पशिक्षित महिलेची ही यशकथा इतर महिलांसाठी प्रेरणादायी आहे. टालेवाडी येथील रहिवासी शिवराज फाटे (वय ४०) यांना नित्रुड शिवारातील टकारवाडी येथे चार एकर वडिलोपार्जीत जमीन वाटून आली. सुरुवातीला यांनी आपल्या शेतात कापूस, ऊस, ज्वारी, बाजरी, आदी पारंपरिक पिके घेतली. यामुळे शेतातील पिकापासून जास्त उत्पन्न मिळत नसे. शिवराज यांचे मेहुणे बीड येथील विवेक सोमवंशी यांच्या मित्राकडे रेशीम शेती असल्याने व त्यांना चांगले उत्पन्न मिळत असल्याने त्यांनी अनेक वेळा शिवराज यांंना रेशीम शेती करण्यास सांगितले.

सन २०११ साली एक एकर शेतात रेशीम शेती करण्याचे ठरवल्यानंतर वडिलांनी यास विरोध केला. परंतु त्यांचे ऐकले नाही. त्यांचे न ऐकता रेशमाचे उत्पन्न घेत राहिले. दरवर्षी उत्पन्नात वाढ होत असतानाच २०१५ साली वाहन अपघातात शिवराज यांचा पाय पूर्णपणे निकामी झाला. आता शेतातील रेशीम शेतीचे काय करायचे? असा प्रश्न पडला. यानंतर दोन वर्षे ही शेती हिश्श्याने दिली; परंतु याद्वारे केवळ खर्चाची बरोबरी होऊ लागली. शिवराज यांची पत्नी छाया यांनी असे नुकसान झाले; तर आपले अवघड होईल. तुम्ही मला काय करायचे? ते सांगा, यापुढे शेती हिश्श्याने द्यायची नाही असे पतीला सांगितले. त्यानुसार त्या मागील तीन वर्षांपासून रेशीम शेती करीत आहेत. त्यांना त्यांचा १४ वर्षांचा मुलगा वेदान्त मदत करीत आहे. रेशीम शेतीत वर्षात पाच लाॅट घेत त्या आहेत. दहा ते बारा क्विंटल माल तयार होतो. त्यास भावही चांगला मिळत असल्याने वर्षाला यांना पाच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न एक एकर रेशीम शेतीतून मिळत आहे. त्यांनी एकही मजूर न लावता रेशीमसाठी पाला खुडण्यापासून तो टाकणे, उगवणही घरीच केली. त्यासाठीे सेंद्रिय खतांचा वापर केला. यामुळे खर्चही वाचला. सध्या केवळ इतर खर्च पाच हजार रुपये येत आहे, असे छाया फाटे यांनी सांगितले.

----

रेशीम पिकासाठी उसाच्या मुकाबल्यात केवळ २५ टक्केच पाणी लागते. यापुढे शेतकऱ्यांनी पारंपरिक पीक पद्धत बंद करून रेशीम पीक पद्धतीकडे वळावे. रेशीम शेती महिलादेखील सहज करू शकतात. यातून मोठ्या प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.

- छाया फाटे, महिला शेतकरी.

....

===Photopath===

290521\img_20210527_105707_14.jpg

===Caption===

माजलगाव तालुक्यातील टालेवाडी येथील छाया शिवराज फाटे यांनी फुलविलेली रेशीम शेती.