पिंपळनेर : बीड तालुक्यातील लोणी शहाजनपूर येथे वादळी वा-यासह झालेल्या पावसात वीज पडून छावणीतील दोन बैल दगावले. ही घटना शुक्रवारी रात्री ८ वाजता घडली.बीड तालुक्यातील पिंपळनेर, नाथापुर, लोणी शहाजणपुर परिसरात सायंकाळी वादळी वाºयासह पावसाने जोरदार हजेरी लावली होती. यावेळी लोणी शहाजनपूर येथील छावणीत वीज पडल्याने शेतकरी राणु शंकर घवाडे (रा. मालेगांव ता. गेवराई) यांचे दोन बैल जागीच ठार पावले, अशी माहिती छावणी चालक विनोद माटे यांनी दिली आहे. दरम्यान, वीज पडून दोन बैल दगावल्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे. आज पंचनामा करण्यात येणार असल्याचे तलाठी पंडित नाईकवाडे यांनी सांगितले. दरम्यान, गेवराई तालुक्यात शुक्रवारी दुपारी, रात्री तसेच शनिवारी पहाटे मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. त्यामुळे शनिवारी दिवसभर उकाडा जाणवला. काही भागात जोरदार पावसामुळे गारवा जाणवत होता. गेवराई, रेवकी, सिरसदेवी, पाचेगाव, उमापूर, चकलांबा परिसरात समाधानकारक हजेरी लागली.
वादळी वाऱ्यात छावणीवर वीज पडून दोन बैल ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 00:05 IST