शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या मदतीने पतीचा खून करून अपघात दाखविण्याचा बनाव उघडकीस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 18:59 IST

आरोपी पत्नी आणि प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतले. 

ठळक मुद्देअपघात दाखविण्याचा बनाव फसला  पत्नी आणि तिचा प्रियकर ताब्यात 

माजलगांव (बीड ) : अनैतिक संबंधात अडसर ठरत असलेल्या पतीचा प्रियकराच्या मदतीने पत्नीने खून केला. तसेच पतीचा मृत्यू अपघात असल्याचा बनाव केला. परंतु,  पोलीसांनी या घटनेचा अवघ्या सहा तासात छडा लावुन खरा प्रकार उघडकीस आणत आरोपी पत्नी आणि प्रियकराला ताब्यात घेतले. 

माजलगांव तालुक्यातील शहाजानपुर येथील कावेरी बालासाहेब शिंदे हिचे किट्टी आडगांव येथील रहिवाशी विठ्ठल गुलाब आगे याच्याशी अनैतिक संबंध होते. कावेरी हिची मुलगी ही विवाहयोग्य असल्यामुळे पती बालासाहेब हा तिला वेळोवेळी समज देत असे परंतु कावेरी ही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने वारंवार या पती पत्नीमध्ये भांडणे होत असत. मागील चार दिवसांपासुन त्यांच्यात भांडण सुरु होते. यातच कावेरी हिने प्रियकर आगेच्या संगनमताने कट रचला. आज पहाटे एक वाजता बालासाहेब हा शेतात दारे धरण्यासाठी गेला. एक तासांनी त्याची पत्नी व तिचा प्रियकर हे शेतात आले. त्यांनी बाळासाहेब यास मारहाण करत रुमालाने गळा आवळुन खुन केला. यानंतर गुन्हा लपविण्यासाठी मृतदेह विद्युत प्रवाह असलेल्या कुंपणावर टाकला.  

सकाळी या प्रकार उघडकीस झाला. यानंतर ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक विकास दांडे, एम.डी. वडमारे,रवि राठोड, गोविंद बाबरे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी अधिक तपास करत संशयावरून आगेला ताब्यात घेतले. त्यास पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. उप विभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली.

टॅग्स :MurderखूनBeedबीडCrime Newsगुन्हेगारी