शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पतीसोबत कारमध्ये भलतीच बाई... पत्नीने केली भररस्त्यात धुलाई!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 09:57 IST

बीडमध्ये औरंगाबादची पुनरावृत्ती; तोंड लपवत दोघांनी ठोकली धूम

बीड : प्रेयसीला गुपचूप हॉटेलमध्ये घेऊन आलेल्या पतीला कारमध्ये बसताना रंगेहाथ पकडून जाब विचारणाऱ्या पत्नीचा औरंगाबादेतील व्हिडीओ मध्यंतरी सोशल मीडियावर चांगलाच गाजला होता. नेमका असाच प्रसंग सोमवारी रात्री साडेआठ वाजता शहरातील गजबजलेल्या आण्णा भाऊ साठे चौकात घडला. प्रेयसीसोबत कारमधून ज्यूसबारमध्ये आलेल्या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले. तोंड लपवत दोघांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला, पण पत्नीने दोघांची भररस्त्यात धुलाई केली. त्याचे झाले असे, शहरातील शिवाजीनगर ठाणे हद्दीत राहणारी एक व्यक्ती काळ्या कारमधून प्रेयसीसह आण्णा भाऊ साठे चौकातील ज्यूसबारमध्ये आली होती. पत्नीला पतीवर शंका होतीच. ती आपला भाऊ व सासूसोबत त्याचा पाठलाग करत आली, तेव्हा ते दोघे ज्यूसबारमध्ये आढळले. पत्नीसह सासू व मेहुण्याला पाहून त्या व्यक्तीच्या पायाखालची वाळूच सरकली. त्याने प्रेयसीसह तेथून काढता पाय घेत कारमध्ये जाऊन बसला. मात्र, पत्नीने कारसमोर उभे राहून पतीसह प्रेयसीला गाडीखाली खेचण्याचा प्रयत्न केला. पती पत्नीची समजूत काढत होता, पण ती काही ऐकण्याच्या स्थितीत नव्हती. पतीची गचांडी पकडून तिने संताप व्यक्त केला, तर  प्रेयसीच्या डोक्याचे केस पकडून जाब विचारला.  भररस्त्यात सुरू असलेला   पती-पत्नी व पतीच्या प्रेयसीचा गोंधळ पाहून चौकात बघ्यांची तोबा गर्दी झाली. प्रेयसीला घेऊन धूम ठोकणाऱ्या पतीने थेट शिवाजीनगर ठाणे गाठले, तर इकडे पत्नीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. घटना शहर ठाण्याच्या  हद्दीत झाल्याने शिवाजीनगर पोलिसांनी पतीलाही शहर ठाण्यात जाण्यास सांगितले. या संदर्भात उशिरापर्यंत पोलिसांत नोंद झाली नव्हती.   विनवणी करत केले पलायन प्रेयसीसोबत पाहून चिडलेल्या पत्नीला शांत करण्याचा पतीने खूप प्रयत्न केला. विनवणी केली. मात्र, तिचा पारा चढला होता. त्यामुळे पतीने प्रेयसीसह कसेबसे कारमधून  पलायन केले. यावेळी पत्नीने रागाच्या भरात कारच्या काचा फोडल्या. जिममध्ये नवऱ्यासह प्रेयसीची चपलेने धुलाईभाेपाळ: अनेक जण जिममध्ये फिटनेस आणि आराेग्यासाठी घाम गाळताना दिसतात; मात्र जिममध्ये घाम गाळण्यासाेबतच इतरही कारनामे करायला लागले. बायकाेला याची माहिती मिळाल्यावर ती जिममध्ये धडकली आणि तुफान राडा केला. ही घटना भाेपाळची आहे. नवऱ्याचे जिममध्ये येणाऱ्या एका युवतीसाेबतचे प्रेमसंबंध असल्याचे कळल्यानंतर हा राडा झाला आहे. जिमच्या आत एक महिला एका पुरुष आणि युवतीला चपलेने मारहाण करीत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. चपलेने मारणारी महिला त्या पुरुषाची पत्नी असून, दुसरी युवती त्याची प्रेयसी आहे. भाेपाळच्या काेहेफिझा परिसरात एक युनिसेक्स जिम आहे. तेथे एक विवाहित पुरुष व्यायामासाठी जात हाेता. तेथेच एक तरुणीही येत हाेती. दाेघांमध्ये मैत्री झाली. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. त्याच्या बायकाेला प्रेम प्रकरणाची माहिती झाली. तिने रंगे हात दाेघांना पकडण्याची याेजना आखली आणि त्यानंतर जिममध्ये हा सर्व राडा झाला. घरी बायकाे आणि मुलांना साेडून बाहेर चक्कर चालवताे, असा आरडाओरडा करून तिने नवरा आणि त्याच्या प्रेयसीला चांगलेच धुतले.ट्रिपल तलाकचे प्रकरण : नवऱ्याने दावा केला आहे, की त्याने तिला घटस्फाेट दिला आहे. तर महिलेचे म्हणणे आहे, की त्याने ट्रिपल तलाक दिला असून, न्यायालयात प्रकरण प्रलंबित आहे.