शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मनोज जरांगेंसह १२ जण आतमध्ये असताना अचानक लिफ्ट का कोसळली? कारण समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2025 14:13 IST

मनोज जरांगे व त्यांचे सहकारी दुपारी १:३३:४२ वाजता लिफ्टमधून जाण्यासाठी चढले. १:३४ वाजता लिफ्ट सुरू केली. १:३४:०५ सेकंदाने लिफ्ट खाली आदळली.

बीड : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे हे रविवारी दुपारी दीडच्या सुमारास बीडमधील शिवाजीराव क्रिटिकल केअर रुग्णालयात एका कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी आले असता सुदैवाने एक अपघात टळला. क्षमतेपेक्षा जास्त लोक चढल्याने लिफ्ट अचानक खाली कोसळली. सुदैवाने या घटनेत सर्वजण सुखरूप बचावले.

मनोज जरांगे यांनी रविवारी ग्राउंड फ्लोअरवरून वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लिफ्टचा वापर केला. जरांगे यांच्यासह सोबतचे कार्यकर्ते, पदाधिकारी लिफ्टमध्ये चढले. परंतु, क्षमतेपेक्षा जास्त लोक लिफ्टमध्ये असल्याने वजन वाढले. त्यामुळे लिफ्ट अचानक पार्किंगपर्यंत खाली आदळली. यामुळे मनोज जरांगे यांच्यासह सहकाऱ्यांना हादरा बसला. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी इमर्जन्सी स्विचने लिफ्टचा दरवाजा बाहेरून उघडला आणि मनोज जरांगे यांच्यासह सहकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले. या घटनेनंतर मनोज जरांगे यांनी जिन्याचा वापर करून रुग्णालयात दाखल कार्यकर्त्याची भेट घेतली. यानंतर जरांगे नाशिककडे रवाना झाल्याचे सांगण्यात आले.

ओव्हरलोडमुळे लिफ्ट आदळलीया लिफ्टची जास्तीत जास्त क्षमता ६८० किलोपर्यंत वजनाची आहे. १० व्यक्ती म्हणजेच एकूण ६८० किलो आहे. परंतु, या लिफ्टमध्ये १२ जण चढले. वजन जास्त झाल्यामुळे ही लिफ्ट खाली आदळल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली.

५ सेकंदात लिफ्ट खाली आलीमनोज जरांगे व त्यांचे सहकारी दुपारी १:३३:४२ वाजता लिफ्टमधून जाण्यासाठी चढले. १:३४ वाजता लिफ्ट सुरू केली. १:३४:०५ सेकंदाने लिफ्ट खाली आदळली.

मनोज जरांगे व त्यांचे कार्यकर्ते ग्राउंड फ्लोअरवरून लिफ्टमध्ये चढले होते. ओव्हरलोडमुळे लिफ्ट पार्किंग फ्लोअरवर आदळली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तातडीने इमर्जन्सी स्विचद्वारे लिफ्टचा बाहेरून दरवाजा उघडला आणि सर्वांना सुखरूप बाहेर काढले.-महारुद्र मुंडे, रुग्णालय कर्मचारी.

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलBeedबीड