शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

बीडला १० हजारांची लाच घेताना वन परिक्षेत्र अधिकारी जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 00:34 IST

गतवर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व सॉ मिलचे नूतनीकरण करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बीडमधील वनपरिक्षेत्र अधिकारी मानसिंग भगवान राजपूत याला शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले.

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : गतवर्षी दाखल झालेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व सॉ मिलचे नूतनीकरण करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना बीडमधील वनपरिक्षेत्र अधिकारी मानसिंग भगवान राजपूत याला शुक्रवारी सकाळी रंगेहाथ पकडले.

गेवराई तालुक्यातील मादळमोही येथे तक्रारदाराची सॉ मिल आहे. गतवर्षी या सॉ मिलवर गुन्हा दाखल झाला होता. यात दोषारोपपत्र न पाठविण्यासाठी व यावर्षी सॉ मिलचे नूतनीकरण करण्यासाठी राजपूतने १५ हजार रुपयांची लाच मागितली होती. पैकी ५ हजार रुपये यापूर्वी त्याने स्वीकारले आहेत. त्यानंतर तक्रारदाराने बीडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. एसीबीने सापळा लावून त्याला शुक्रवारी सकाळी पकडले. राजपूत विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरक्षित जागेसाठी पळवापळवीसकाळी राजपूत याने तक्रारदाराला पैशाची मागणी करीत कार्यालयात बोलावले. त्याप्रमाणे एसीबीने सापळा लावला; परंतु त्याने तेथे लाच स्वीकारली नाही. त्यानंतर राजपूतने त्याला बसस्थानकात बोलावले. तेथून जालना रोडवरील एका हॉटेलमध्ये नेले. नंतर वाहतूक शाखेच्या पोलीस चौकीसमोरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथून बाहेर येत त्याने पैशाची मागणी केली. तक्रारदाराने राजपूतच्या हातात पैसे ठेवताच एसीबीच्या अधिकाºयांनी झडप घातली.