शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

गहू खरेदीचा करार; तिघांकडून ६० लाखाला चुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 23:50 IST

एक वर्षापूर्वी गहू खरेदीचा लेखी करार केला असून, यापोटी वेळोवेळी टप्प्याटप्प्यात साठ लाख रुपये घेतले. याउपरही करार पूर्ण न करता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ईश्वर शिंगटे (रा. आष्टी) यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात दोन दलाल व करारदार असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल : आष्टी तालुक्यातील व्यापाराला मुंबई, इंदौरवाल्यांनी घातला गंडा

कडा : एक वर्षापूर्वी गहू खरेदीचा लेखी करार केला असून, यापोटी वेळोवेळी टप्प्याटप्प्यात साठ लाख रुपये घेतले. याउपरही करार पूर्ण न करता फसवणूक झाल्याचे लक्षात येताच ईश्वर शिंगटे (रा. आष्टी) यांच्या फिर्यादीवरुन आष्टी पोलीस ठाण्यात दोन दलाल व करारदार असा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.आष्टी तालुक्यातील कडा येथील विठ्ठल सोनवणे, गोरेगाव मुंबई येथील तेजन मुन्शी, या दोन दलालांच्या माध्यमातून ग्लोबलअ‍ॅग्रो इंडस्ट्रीजसाठी आष्टी येथील व्यापारी ईश्वर काशिनाथ शिंगटे यांनी इंदौर (मध्यप्रदेश) येथील विजय यादव यांच्यासोबत गहू खरेदीचा लेखी करार २० नोव्हेंबर २०१८ रोजी केला होता. त्या करारापोटी शिंगटे यांनी टप्प्याटप्प्याने चेक व आरटीईजीएसच्या माध्यमातून साठ लाख रुपये दिले होते. सदरील कराराचे पैसे देखील दोन दलालांना देण्यात आले होते. पण या दलालांनी अंधारात ठेवून परस्पर पैसे हडप केल्याचे समजताच ईश्वर शिंगटे यांच्या फिर्यादीवरुन गुरूवारी रात्री तिघांविरोधात लेखी कराराचे उल्लंघन व फिर्यादीचा विश्वासघात करून फसवणूक केल्याचा गुन्हा गुरुवारी रात्री दाखल झाला आहे. आरोपी फरार असून, पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक भारत मोरे करीत आहेत.पोलिसांनी फिर्यादीला दिला कोर्टात जाण्याचा सल्लाईश्वर शिंगटे यांना आपली फसवणूक होत असल्याचे लक्षण दिसताच त्यांनी ४ जून २०१९ रोजी आष्टी पोलीस ठाण्यात, तर ६ जून २०१९ रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात फिर्याद दिली होती.मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष करीत कसलीही कारवाई केली नाही. उलट फिर्यादीला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्रfraudधोकेबाजी