शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

बीड जिल्ह्यात चाललंय काय? आष्टीत दोन हत्येनंतर अंबाजोगाईत घरावर गोळीबाराची घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 13:33 IST

अंबाजोगाई शहरालगत असलेल्या मोरेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी घडली.

अंबाजोगाई (बीड) : सद्यस्थितीत बीड जिल्ह्यातील वातावरण अतिशय संवेदनशील असताना अंबाजोगाई शहरात गोळीबार झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरालगत असलेल्या मोरेवाडी परिसरात ही धक्कादायक घटना आज शुक्रवारी सकाळी घडली. दरम्यान, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील वाहिरा येथे गुरूवारी रात्री दहा वाजेच्या दरम्यान तीन सख्खा भावांवर गावातील काही लोकांनी लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला केला. या हल्ल्यात दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू असून तिसरा गंभीर जखमी झाला आहे. २४ तासांत दोन गंभीर घटना उघडकीस आल्याने बीड जिल्हा पुन्हा चर्चेत आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोरेवाडी परिसरातील माऊलीनगर येथील एका घरावर माथेफिरू तरुणाने गोळी झाडली. सुदैवाने ही गोळी घराच्या खिडकीवर लागल्याने कोणासही इजा झाली नाही. गोळीबारानंतर त्या तरुणाने घटनास्थळाहून पलायन केले. सदरील तरुण रेणापूर येथील रहिवासी असून ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अंबाजोगाई शहर पोलीस या तरुणाचा कसून शोध घेत असून त्याला अटक झाल्यानंतरच या घटनेमागचे खरे कारण समोर येऊ शकणार आहे.

आष्टी तालुक्यात दोन भावांची हत्यादरम्यान, आष्टी तालुक्यातील हातोळण येथील अजय विलास भोसले, भरत विलास भोसले, कृष्णा विलास भोसले हे तिघे भाऊ वाहिरा येथे गुरूवारी आले होते. याच ठिकाणी वाहिरा गावातील व बाहेरील काही लोक जमा झाले होते. गुरूवारी दुपारपासून हे सगळे याच ठिकाणी होते. रात्री साडे नऊ ते दहाच्या दरम्यान यातील काही लोकांनी या तीनही भावांवर लोंखडी राॅड, धारदार शस्त्राने हल्ला चढवला. या हल्ल्यात अजय विलास भोसले, भरत विलास भोसले या दोन सख्खा भावांचा जागीच मृत्यू झाला. तर तिसरा भाऊ कृष्णा विलास भोसले हा गंभीर जखमी झाला. असून त्याच्यावर अहिल्यानगर येथे उपचार सुरू आहेत.

टॅग्स :BeedबीडCrime Newsगुन्हेगारी