शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

जनावरांचा मृत्यू कशामुळे ? आता नमुने पुण्याच्या लॅबमध्ये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2019 00:39 IST

तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील १० दिवसांपासून अज्ञात रोगामुळे जवळपास ४० जनावरांचा मृत्यू झाला असून, या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

ठळक मुद्दे१० दिवसांनंतरही कारण अस्पष्ट : अंथरवण पिंपरीतील पशुपालकांची मदतीची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील अंथरवन पिंपरी येथे मागील १० दिवसांपासून अज्ञात रोगामुळे जवळपास ४० जनावरांचा मृत्यू झाला असून, या मृत्यूचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. शवविच्छेदनानंतर पाठविलेल्या नमुन्यांचे मराठवाड्यासाठी असलेल्या औरंगाबाद येथील रोगनिदान प्रयोगशाळेतही निदान झाले नसल्याने हे नमुने आता पुणे येथील विभागीय रोगनिदान (रोग अन्वेषण) प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. शासनाच्या प्रयोगशाळांमधील असुविधा यानिमित्ताने चव्हाट्यावर आली आहे. आता पुणे येथील अहवाल आल्यानंतरच जनावरांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, मात्र तोपर्यंत पशुपालकांमध्ये भितीचे वातावरण आहे.अंथरवन पिंपरी येथे जनावरांच्या मृत्यूचे सत्र सुरु झाल्यानंतर पशुपालकांमध्ये खळबळ उडाली. तर लोकप्रतिनिधी व त्यांच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी पशुपालकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पशुसंवर्धन विभागाच्या सूत्रानुसार अंथरवन पिंपरी व लगतच्या परिसरातील शेतकºयांच्या पाच शेळ्या, ३०-३२ कोकरे, मेंढ्या तसेच व ५ ते ६ जनावरांचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर सतर्क झालेल्या पशुसंवर्धन विभागाने गावातील जनावरांवर उपचार करण्यासाठी मोहीम सुरु केली. ८ डॉक्टरांचे पथक गावात ठाण मांडून आहे. रविवारपर्यंत ७०० जनावरांचे लसीकरण पूर्ण केल्याचे सांगण्यात आले. तसेच इतर उपचारामुळे मागील दोन दिवसात जनावरे दगावली नसल्याचे सांगण्यात आले. जनावरांच्या मृत्यूचे दहा दिवसानंतरही कारण स्पष्ट झाले नाही. रोगाचे निदान होत नसल्यामुळे उपचारात अडचणी येत आहेत. मृत्यूचे कारण अजूनही अस्पष्ट असल्यामुळे शेतकºयांमध्ये संभ्रम आहे.औरंगाबाद : निदान झाले नाहीदरम्यान ८ डॉक्टरांच्या पथकामार्फत सुरु असलेले उपचार व लसीकरणामुळे जनावरांचे मृत्यू रोखण्यात यश आले आहेत.तसेच ज्या जनावरांना लागण झाल्याची शक्यता आहे अशा ९ गायी, ९ म्हशी, व ११ शेळ््यांवर रविवारी उपचार करण्यात आले आहेत.औरंगाबादच्या प्रयोगशाळेत निदान न झाल्याने पुणे येथील प्रयोगशाळेकडे नमुने पाठविले आहेत. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

टॅग्स :BeedबीडAgriculture Sectorशेती क्षेत्र