शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जलाशयाच्या ५०० मीटर परिसरातील विहिरी संरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 00:21 IST

तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा लक्षात घेता यावर उपाय म्हणून जलाशयाबरोबरच त्याच्या पाचशे मीटर परिघातील विहिरी देखील आरक्षित साठा म्हणून संरक्षित केल्या आहेत. तेथील वीजपुरवठा खंडीत केल्याची माहिती नायब तहसीलदार किशोर सानप यांनी दिली.

ठळक मुद्देपाणी टंचाईवर उपाय : शिरुर कासारचे प्रशासन लागले कामाला, उपसा टाळण्यासाठी देखरेख पथक नेमले ; वीज पुरवठा तोडला

लोकमत न्यूज नेटवर्कशिरूर कासार : तालुक्यातील पाणीटंचाईचा आढावा लक्षात घेता यावर उपाय म्हणून जलाशयाबरोबरच त्याच्या पाचशे मीटर परिघातील विहिरी देखील आरक्षित साठा म्हणून संरक्षित केल्या आहेत. तेथील वीजपुरवठा खंडीत केल्याची माहिती नायब तहसीलदार किशोर सानप यांनी दिली.तालुक्यात अल्प पावसामुळे आॅक्टोबरमध्येच पाणी टंचाई सुरू झाली आहे. भविष्यात दीर्घकाळ ऐन कडाक्याच्या उन्हाळ्यात ही परिस्थिती आधिक उग्र रूप धारण करेल अशा वेळी पाणी आणायचे कोठून यावर हा उपाय प्रशासनाने केला आहे.तालुक्यात उथळा, सिंदफणा, घाटशिळा हे मध्यम प्रकल्प तर खोकरमोह, खरगवाडी हिवरसिंगा लघु प्रकल्प त्याशिवाय नारायडगड बृहद लघु आणि फुलसांगवी, निमगांव वारणी, सिध्देश्वर, मोरजळवाडी येथे असलेल्या लघु तलावात पाणीसाठा नसल्यातच जमा आहे. असे असले तरी भोवताली असलेल्या विहिरींना सध्या तरी पाणी आहे. त्या पाण्याचा आधार मिळू शकतो म्हणून याचा उपसा होऊ नये म्हणून वीजपुरवठा खंडीत केला असून देखरेखीसाठी पथक तयार ठेवले आहे. चोरट्या मार्गाने आकडे टाकून पाणी उपसा करण्याचा प्रयत्न केल्यास त्यावर कठोर कार्यवाही करण्यात येणार असून दुष्काळ परिस्थितीचे भान ठेऊन सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.पाणी टंचाईचे सर्वांनीच भान ठेवावे. ज्यांच्या बोअरला पाणी आहे, त्यांनी शेजारच्यांना पाणी देण्याची माणुसकी जपावी. विहिरीला, बोअरला पाणी आहे परंतु ते पिण्यासाठी घरगुती वापरासाठी प्रतिबंध केला जात आहे. पाण्याबाबत कोणीही आततायीपणा करू नये असे आवाहन नायब तहसीलदार किशोर सानप व लक्ष्मण धस यांनी केले आहे.मोटारी बंद ठेवण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवरपाचशे मीटर आंतरातील विहिरी संरक्षित केल्या आहेत. तेथील वीज पुरवठा खंडीत केला आसला तरी गावाला पाणी मिळावे म्हणून पाणी पुरवठ्यापुरती वीज जोडून दिली जाईल. मात्र यावर अन्य दुसऱ्या मोटारी चालणार नाही याची जबाबदारी त्या ग्रामपंचायतींवर सोपवण्यात आली असून तसे त्यांच्याकडून लेखी घेण्यात येणार आसल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :Beedबीडwater shortageपाणीटंचाई