शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘हम जवान हैं... देश के लिए जिएंगे और मरेंगे !’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:20 IST

अपघातातून बचावलेल्या एका जवानाची विचारपूस करताना त्याने दिलेले उत्तरच तसे होते. तो म्हणतो, ‘भाई, हम जवान हैं, देश के लिए जिएंगे और मरेंगे.’ हे वाक्य ऐक णाºयांच्या अंगावर शहारे उमटले.

सोमनाथ खताळ ।

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : ‘ए मेरे वतन के लोगों,तुम खुब लगा लो नारा,यह शुभ दिन हैं सब कालहरा लो तिरंगा प्यारा’हे गीत कानावर जरी पडले तरी अंगावर शहारे उभे राहतात. प्रत्येकाच्या मनात देशभक्ती जागी होते. असाच अनुभव रविवारी जिल्हा रुग्णालयात बीडकरांना आला. अपघातातून बचावलेल्या एका जवानाची विचारपूस करताना त्याने दिलेले उत्तरच तसे होते. तो म्हणतो, ‘भाई, हम जवान हैं, देश के लिए जिएंगे और मरेंगे.’ हे वाक्य ऐक णाºयांच्या अंगावर शहारे उमटले.

परळी येथील मुरलीधर शिंदे या जवानाचा अल्पशा आजाराने चंदीगढ येथे मृत्यू झाला. रविवारी परळी येथे त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार होते. त्यांना मानवंदना देण्यासाठी अहमदनगर येथील भारतीय लष्करी प्रशिक्षण केंद्रातील जवानांची तुकडी परळीकडे जात होती. परंतु त्यांच्या गाडीचा तेलगावजवळ अपघात झाला. यामध्ये तब्बल १५ जण बालंबाल बचावले. ‘काळ आला होता, पण वेळ आली नव्हती’ अशीच काहीसी प्रचिती या अपघाताने पहावयास मिळाली.

दरम्यान, २४ तास देश संरक्षणासाठी सीमेवर लढणा-या जवानांप्रती प्रत्येक भारतीयाला आदर, सन्मान व अभिमान आहे. या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील शेकडो लोक मदतीसाठी धावले. कोणी पाणी दिले, कोणी आधार दिला, कोणी जखमेवरील रक्त स्वत:च्या कपड्याने पुसले. हे पाहून जवानांनाही धीर मिळाला. एवढा मोठा अपघात होऊनही ते खचले नाहीत. त्यांना जिल्हा रुग्णालयात सुखरुप दाखल केले. येथे त्यांच्यावर तात्काळ उपचारही करण्यात आले. जिल्हा आरोग्य प्रशासन व बीड जिल्हा पोलीस दल मदतीसाठी धावपळ करताना दिसून आले. हे सर्व पाहून बीडकरांमध्ये माणुसकी अजूनही शिल्लक आहे, याचा अनुभव आला.

एसपींना म्हणाले, ‘जय हिंद’ सरअपघातांत गंभीर जखमी होऊनही वरिष्ठांबद्दलचा आदर, सन्मान या जवानांच्या प्रत्येक हालचाल व बोलण्यातून दिसत होता. माहिती मिळताच आ. विनायक मेटे, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, उपअधीक्षक सुधीर खिरडकर यांनी रुग्णालयात धाव घेऊन जखमी जवानांची विचारपूस करीत त्यांना मदत केली. अधीक्षकांची जवानांना ओळख होताच ‘जय हिंद सर’, असा आवाज त्यांच्या तोंडून निघाला. यातून खूप काही पहावयास, शिकण्यास आणि अनुकरण करण्यासारखे दिसून आले.उपअधीक्षकांनी वरिष्ठांना कळविलेपअधीक्षक खिरडकर यांनी जखमी जवानांची विचारपूस केली. एका जवानाने ‘हमारे आॅफिसर्ससे बात करवा लो’, असे म्हटले. यावेळी खिरडकर यांनी तात्काळ नगरच्या अधिकाºयांशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. तसेच बीडमध्ये जवानांना पूर्ण सहकार्य केले जाईल, आम्ही सोबत आहोत, असे म्हणत त्यांना धीर दिला.मदतीसाठी सरसावले हातरुग्णालयाच्या प्रवेशद्वारातून जवानांचे वाहन येताच परिसरातील विविध क्षेत्रातील नागरिक मदतीसाठी धावले. कोणी स्ट्रेचर आणले, तर कोणी वाहनांतून उतरवून आपल्या खांद्यावर घेत स्ट्रेचरपर्यंत पोहचवत होते तर, कोणी खांद्यावर हात देऊन त्यांच्या चालण्याची काठी बनले. जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर, परिचारिका व शिकाऊ विद्यार्थिनींनी औषधोपचारासाठी तत्परता दाखवली. एका खाजगी रूग्णालयातील डॉक्टरनेही मोफत उपचार केले. रात्री उशिरा आ. विनायक मेटे यांनी जवानांची भेट घेतली.