शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
2
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
3
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
4
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
5
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
6
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
7
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
8
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
9
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
10
"तुमचं वक्तव्य लाजिरवाणं, आम्ही हमासचे दहशतवादी मारले", प्रियंका गांधींच्या 'त्या' दाव्यामुळे इस्राइल संतप्त   
11
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
12
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
13
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
14
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...
15
अहो आश्चर्यम्...! ६५० किमी पर्यंतची रेंज असलेल्या या २ कारला जुलै महिन्यात एकही ग्राहक मिळाला नाही! जाणून घ्या किंमत
16
शुबमन गिलची हवा! इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या टीम इंडियाच्या कॅप्टनला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
17
टाटा मोटर्सचा ऐतिहासिक निर्णय! 'या' दिवशी कंपनीचे होणार विभाजन; तुम्हाला काय फायदा?
18
व्हायरल होण्याचं भूत, मिठी मारुन कपलची कालव्यात उडी; Video पाहून वाढेल हृदयाची धडधड
19
"भावांनो, असं आयुष्य कोण जगेल..."; कौटुंबिक वादातून पतीनं संपवलं जीवन, मृत्यूपूर्वी दीड मिनिटांचा Video
20
ट्रम्प यांच्या ५०% टॅरिफनं मुकेश अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर घसरला? ₹१७ वर आला भाव!

खंडेश्वरीदेवीचा मार्ग यंदाही खडतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2018 00:21 IST

शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मोतच्या शारदीय नवरात्र उत्सवास बुधवारपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र, काळा हनुमान ठाणा ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम राजकीय गटबाजीत अडकल्याने अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे यंदाही खंडेश्वरी देवीच्या भक्तांचा मार्ग खडतर असल्याचे दिसत आहे.

ठळक मुद्देउद्यापासून नवरात्र महोत्सव : भाविकांच्या सुविधेसाठी मंदिर ट्रस्ट सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कबीड : शहराचे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी मोतच्या शारदीय नवरात्र उत्सवास बुधवारपासून घटस्थापनेने प्रारंभ होत आहे. मात्र, काळा हनुमान ठाणा ते मंदिरापर्यंतच्या रस्त्याचे काम राजकीय गटबाजीत अडकल्याने अर्धवट अवस्थेत आहे. त्यामुळे यंदाही खंडेश्वरी देवीच्या भक्तांचा मार्ग खडतर असल्याचे दिसत आहे.डोंगराळ परिसरात वसलेल्या खंडेश्वरी मंदिरात नवरात्रोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे उत्सवाची तयारी सुरु आहे. उत्सव काळात या परिसराला जत्रेचे स्वरुप येते. एमआयडीसी रोड तसेच गांधीनगरमार्गे शहरातील भाविकांना जाण्यासाठी रस्ते आहेत. त्याशिवाय महत्त्वाचा पेठ भागातून जाणारा काळा हनुमान ठाणामार्गे असलेला रस्ता शहरातील जवळपास सर्वच भाविकांसाठी कमी अंतराचा आहे. रोज नवसपूर्तीसाठी जाणारे आणि कुटुंबासह पायी जाणारे भाविकही याच रस्त्याने जातात. त्यामुळे पहाटेपासून रात्रीपर्यंत वर्दळ असते. मात्र, हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. जागोजागी खड्डे पडलेले आहेत.यंदा मुख्यमंत्री निधीतून या रस्त्याचे काम सुरु होत असतानाच टेंडरवरुन आक्षेप घेण्यात आले. नगर पालिकेतील राजकीय वाद सर्वश्रूत आहे. या राजकारणात रस्त्याचे काम अचानक थांबले आहे. त्यामुळे रस्ता आहे तसाच खराब आहे. टेंडर आणि राजकारण बाजूला ठेवत या रस्त्याचे काम प्राधान्याने गरजेचे असताना मात्र, मात्र दोन्ही बाजूंकडून मौन बाळगले जात आहे. आता काम सुरु केलेतरी ते तीन-चार दिवसात पूर्ण होणे अशक्य असल्याने यंदाही खंडेश्वरीच्या दर्शनासाठी भाविकांची वाट खडतर राहणार असल्याचे रस्त्याची दुरवस्था पाहिल्यानंतर स्पष्ट दिसत आहे. दोन दिवसात तातडीने कोणते उपाय करता येतील या दृष्टीने प्रशासन व नगर परिषदेने लक्ष घालण्याची गरज आहे. तसेच सर्व पथदिवे चालू करण्याची गरज आहे.खंडेश्वरीसाठी २५ तोळ्यांचा सुवर्णहार४श्री खंडेश्वरी देवस्थान ट्रस्टच्या वतीने मागील काही दिवसांपासून उत्सवाची जय्यत तयारी सुरु आहे. विश्वस्तांसह कार्यकर्ते कामात व्यस्त आहेत. यंदा माता खंडेश्वरीच्या दागिन्यात वाढ करण्यात आली आहे. मंदिर ट्रस्टच्या वतीने पुणे येथील एका सराफ्याकडून २५ तोळ्यांचा फुलांची डिझाईन असलेला सुवर्णहार, तर बीड येथील सराफ्याकडून वाटीच्या आकारातील डोरले तयार करण्यात आले आहे. ८ लाख ३० हजार रुपयांचा सुवर्ण हार आणि १ लाख ८० हजाराचे डोरले असल्याचे सांगण्यात आले.

टॅग्स :BeedबीडNavratriनवरात्री