शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
2
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
3
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
4
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
5
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
6
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
7
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
8
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
9
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
10
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
11
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
12
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
13
Palmistry: आत्ताच आपला तळहात तपासा! 'अशी' भाग्यरेषा असणारे लोक होतात प्रचंड श्रीमंत
14
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
15
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
16
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
17
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
18
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
19
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
20
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
Daily Top 2Weekly Top 5

पोहताना विहिरीतील पाण्याचा अंदाज आला नाही; दोन मुलांचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 17:17 IST

बाहेगव्हाण येथील बंधाऱ्यावर रोहन व लखनसह १० ते १५ मुले पोहण्यासाठी गेले होते.

ठळक मुद्देबंधाऱ्यात अनेक मुले पोहणे शिकत होतीदोघे मुले बंधाऱ्या शेजारील विहिरीकडे गेली

वडवणी (जि. बीड) : तालुक्यातील बाहेगव्हाण येथील १० वर्षीय रोहन रामेश्वर मस्के व लखन महादेव पोटभरे या दोन मुलांचा गावातील नदीकाठच्या विहिरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना २५ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास बंधाऱ्यावर पोहण्यासाठी गेल्यानंतर घडली. 

बाहेगव्हाण येथील बंधाऱ्यावर रोहन व लखनसह १० ते १५ मुले पोहण्यासाठी गेले होते. बंधारा खोल नसल्याने व त्याठिकाणी पाय टेकत असल्यामुळे अनेकजण पोहायला शिकत होते.  याच बंधाऱ्याजवळ एक विहीर आहे. पाणी जास्त असल्यामुळे विहिरीच्या खोलीचा अंदाज येत नाही. याच विहिरीकडे रोहन व लखन हे पोहण्यासाठी गेले होते. बराच वेळ ते दोघे न दिसल्यामुळे बंधाऱ्यावर पोहणाऱ्या इतर मुलांनी आरडाओरड करत गावाच्या दिशेने धाव घेतली.  त्यानंतर ही माहिती गावकऱ्यांना व मृतांच्या घरच्यांना समजताच त्यांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी गावातील तरुणांनी विहिरीत उडी मारून तळाशी असलेल्या दोघांना बाहेर काढले. त्यानंतर तात्काळ उपाचारासाठी वडवणी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ बाळासाहेब तांदळे, डॉ अरूण मोराळे यांनी तपासून त्या दोघांना मृत घोषित केले. शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

पोटभरे कुटुंबावर शोककळालखन पोटभरे याचे वडील दोन वर्षांपूर्वी मयत झाले होते. लखन हा चुलता रवी पोटभरे यांच्याकडे राहत होता. रवी पोटभरे हे मजुरी करून कुटुंबाचा सांभाळ करीत होते. वडिलांचे छत्र हरवलेले असताना मुलगाही मयत झाल्याने पोटभरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. लखनला पोहता येत होते तर, रोहन हा शिकत होता. विहिरीतील पाण्याचा अंदाज न आल्याने रोहन हा विहिरीच्या पाण्यात बुडाला. त्यानंतर लखनदेखील बुडाला, यात त्यांचा मृत्यू झाला.

टॅग्स :Deathमृत्यूBeedबीडdrowningपाण्यात बुडणे