लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. नगरपंचायत मार्फत २२ टँकरद्वारे आष्टी शहराला पाणीपुरवठा होत आहे. पाटोदा तालुक्यातील ग्रामीण भागात ७१ तर पाटोदा नगरपंचायतला २२ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात ११० टँकरद्वारे तर नगरपंचायतला ७ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे.आष्टी तालुक्यातील चिंचेवाडी, बाळेवाडी, ठोंबळ सांगवी या ठिकाणच्या तक्रारींमुळे टँकर बद्दल करून दिले आहेत. उकंडा प्रकल्पात बोडक्या घेतल्या होत्या तेथे आणखी पाच विहिरी सुरू केल्या आहेत. त्यामुळे शिरूर तालुक्यातील गढूळ पाण्याचा प्रश्न दोन दिवसात सुटणार आहे. आष्टी पंचायत समितीला १०, पाटोदा पंचायत समिती ५ आणि शिरूर पं.स. ला ५ स्टँडबाय टँकर देण्याचे आदेश दिल्याचेही आ. धस यांनी सांगितले. दोन ते तीन दिवसांत आष्टी तालुक्यातील ५० वस्ती, रस्ते आणि शिरूर तालुक्यातील २५ व पाटोदा तालुक्यातील २५ वस्ती रस्ते सुरू होतील. तसेच रस्त्याच्या कडेला तसेच सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याचे धस यांनी सांगितले.आष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे. त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकर भरण्याची परवानगी मागितली असून पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे विभागीय आयुक्त केंद्रेकर आणि नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यामुळे प्रशासन पूर्णपणे जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचेही आ. धस म्हणाले.आष्टीचे विद्यमान आ.भीमराव धोंडे यांनी दोन दिवसांपूर्वी आष्टीच्या तहसील कार्यालयात दुष्काळी आढावा बैठक घेऊन भीषण पाणीटंचाई संदर्भात प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे तर दुसऱ्याच दिवशी आ. सुरेश धस यांनी प्रशासनाची बाजू पत्रकार परिषदेतून लावून धरल्याने आगामी काळात या ठिकाणी राजकीय संघर्ष अटळ असल्याचे जाणवते आहे.अहमदनगर जिल्ह्यातून येणार पाणीआष्टी तालुक्याला सीना प्रकल्पातून होणारा पाणीपुरवठा प्रकल्पात पंधरा दिवस पुरेल एवढेच पाणी राहिले आहे.त्यामुळे श्रीगोंदा तालुक्यातील भावडी, कर्जत तालुक्यातील दुर्गाव, विळद घाट, बुरा नगर आणि नगरमधील वसंत टेकडी येथून टँकरची भरण्याची परवानगी मागितली आहे.प्रशासन जनतेस पाणीपुरवठा करण्यासाठी सज्ज असल्याचे यावेळी आ. सुरेश धस म्हणाले. सध्या या तीन तालुक्यात पाणीप्रश्न ऐरणीवर आला असून, पाणीटंचाईने उग्ररुप धारण केलेले आहे.
आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये ४०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 23:56 IST
आष्टी, पाटोदा, शिरूर तालुक्याची तहान भागवण्यासाठी शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहे. आष्टी तालुक्यात १७० टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे.
आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये ४०२ टँकरद्वारे पाणीपुरवठा
ठळक मुद्देभावडी, दुर्गाव, नगरच्या वसंत टेकडीवरून टँकर भरणार- सुरेश धस